पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज पालखीतील वारक-यांसाठी मंगळवार दि,२१/६/२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन कृष्ण मंदिराजवळ निगडी येथे करण्यात आले होते. या शिबीरात अभिनेत्री रुपाली पाथरे सहभागी झाल्या होत्या.
या शिबीरात सर्दी,खोकला,ताप,थंडी,अंगदुखी,पाठदुखी,नाक,कान,घसा,दंतरोग ई ची तपासणी करुन औषधांचे वाटप करण्यात आले.या शिबीराचा ६८५ वारक-यांनी लाभ घेतला तसेच कोरोनाचा कालावधी असल्याने ५०० मास्कचे वाटप करण्यात आले.जेष्ठ नागरिकांसाठी हात पायांची मसाज करुन दिली याचा लाभ जवळजवळ ७०० वारक-यांनी घेतला.
सर्व पालखी मार्गस्त झाल्यावर पिंपरी चिंचवड मनपासोबत रस्ता साफ करण्यासाठी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.यामध्ये डॉ मृणाल फोंडेकर,डॉ अरविंद वाघचौरे,डॉ दिनेश काबरे,डॉ निरज पाटील,डॉ सुशिल करडे,डॉ प्रिया नायर यांनी तपासणी करुन औषधे दिली.औषधांसाठी लक्ष्मी मेडीकल चिंचवडगाव,सप्तश्रुंगी मेडिकल काळेवाडी,शुश्रुत आयुर्वेद चिंचवड स्टेशन यांनी केली होती.
मसाज सेवा अनिल रमेश बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.याचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व सभासद यांनी केले होते.यामध्ये आदर्श महिला बचत गट थेरगाव सहभागी झाले होते.

error: Content is protected !!