
मुंबई:
शिवसेना विधीमंडळ आमदारा मध्ये फुट पडलेल्या पार्श्वभुमी “ मी साहेबा सोबत” अशी शिवसैनिकाची चळवळ चालू झाली आहेत. “ मुंबई डबेवाला असोशिएशन” मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांचे सोबत आहे. मुंबईचे डबेवाले शिवसेने सोबत काल ही होते आज ही सोबत आहे आणी उद्या ही सोबत राहतील !
कारण गेल्या पाच वर्षात शिवसेनेने डबेवाल्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रमाणीक पणे प्रयत्न केले आहेत, आम्ही सेने बरोबर आहोत असा विश्वास मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेने डबेवाल्यांना लोकल रेल्वे स्टेशन बाहेर मोफत सायकल स्टॅन्ड उपलब्द करून दिले आहेत. चर्नीरोड,ग्रॅटरोड,अंधेरी येथील सायकल स्टॅन्ड पुर्ण होऊन डबेवाले ते स्टॅन्ड वापरत आहेत व अनेक रेल्वे स्टेशन बाहेर सायकल स्टॅन्डचे काम प्रगती प्रथावर आहे. जसं जशी जागा उपलब्द होईल त्यांवर ते अवलंबून आहे.
मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांचे वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने डबेवाल्यांना मोफत सायकली वाटण्यात आल्या आहेत त्या मुळे डबेवाल्यांना काम करण्यासाठी सायकल मोफत उपलब्द झाल्या.
डबेवाल्यांच्या घराचा प्रश्ना बाबत आघाडी सरकारच्या वतीने महत्वाच्या बैठका मंत्रालयात पार पडल्या जवळ जवळ डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न हा अंतीम टप्या पर्यंत पोहचला आहे लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल. डबेवाल्यांना मुंबई महानगर पालिकेतच्या वतिने वांद्रे या ठिकाणी डबेवाला भवनसाठी जागा देण्यात आले.
डबेवाल्यांच्या आरोग्य बाबत मुंबई महानगर पालिका सभागृहांने ठराव पारीत केला आहे की डबेवाल्यांच्या उपचारासाठी मुंबई महानगर पालिका रूग्णालयात विषेश कक्ष असावा लकरच या ठरावाची अंमल बजावणी होईल अशी आशा आहे. गेल्या पाच वर्षात आश्वासनांची पुर्तता करण्याचा प्रामणीक प्रयत्न शिवसेने कडून झाला आहे. तसेच
मुंबईत मराठी अस्मिता जपण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी शिवसेनेची नाळ जोडली गेली आहे. आम्ही ही मराठी आहोत म्हणुन “ मुंबई डबेवाला असोशिएशन” मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांचे सोबत आहे.
- महावीर हाॅस्पिटल येथे डाॅक्टर डे साजरा
- रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विकेश कांतीलाल मुथा
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


