
श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने उत्साहात प्रस्थान
वडगाव मावळ:
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे आनंदी वातावरणात प्रस्थान झाले.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या महासंकटामुळे सांप्रदायिक क्षेत्रातील भाविक भक्तांना पंढरपूर च्या वारीला मुकावे लागले होते. पांडुरंगाच्या कृपेने यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव जवळपास कमी झाला असून तसेच शासनाने कोरोनाचे नियम पूर्ण शिथिल केल्याने सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व भाविक पायी वारीत सहभागी झाले होते.
यावेळी दिंडींचे संस्थापक नगराध्यक्ष मयुर ढोरे, दिंडीं अध्यक्ष महेंद्र ढोरे यांनी वारकरी संप्रदायातील भाविकांचे तसेच नागरिकांचे स्वागत केले.
प्रथमता सांप्रदायिक क्षेत्रातील भाविक आणि शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी तसेच नागरिक व महिला भगिनींनी विणापूजन करत सर्वांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. या पायी दिंडी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे मान्यवर मंडळी एकत्रित सहभागी झाले होते.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरास प्रदक्षिणा मारत टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाच्या जयघोषात व भक्तिमय वातावरणात फुगडीचा फेर धरत दिंडीचे बाजारपेठेतून प्रस्थान झाले. यावेळी शहरातील जैन समाजाच्या वतीने पायी दिंडीवर फुलांची उधळण करत एकात्मतेचे दर्शन घडवले.
यावेळी दिंडी जि. प. सभापती बाबुराव वायकर, दिंडी संस्थापक नगराध्यक्ष मयुर ढोरे, दिंडी अध्यक्ष महेंद्र ढोरे, उपनगराध्यक्ष पुनम जाधव, मा. सभापती गणेश ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, देवस्थान विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, रा काँ. वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सभापती गुलाब म्हाळसकर, चंद्रकांत ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेविका शारदा ढोरे, सुनिल ढोरे, अंबादास बवरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, रा काॅ. युवक अध्यक्ष अतुल वायकर, विणेकरी हभप शिवाजी शिंदे, रा.काॅ. उपाध्यक्ष युवराज ढोरे आणि शहरातील नागरिक व पंचक्रोशीतील भाविक, भगिनी पत्रकार बांधव, जैन बांधव, मोरया महिला प्रतिष्ठानच्या महिला भगिनी आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- महावीर हाॅस्पिटल येथे डाॅक्टर डे साजरा
- रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विकेश कांतीलाल मुथा
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


