टाकवे बुद्रूक:
आंदर मावळाला जोडणा-या  मुख्य रस्त्यामधील अडथळा होत असलेले विजेचे  खांब स्थलांतरित करावे अशी  मागणी होत आहे. 
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या  विशेष प्रयत्नातून फ़ंड उपलब्ध होऊन कान्हे फाटा ते टाकवे बुद्रुक या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाला मागील काही महिन्यापासून  सुरुवात झाली.
हे काम पर्व तत्वास येत असताना माहावितरण वडगाव मावळ व सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ यामध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण होत असताना महावितरणचे विद्युत वाहक लाईन व खांब  रस्त्या मध्ये आले आहे. या ठिकाणी कान्हे येथील महिंद्रा कंपनी समोरील या दोन ते तीन खांबामुळे अपघात होऊन वित्त व जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.
परिणामी या भागातील खांब  काडून महावितरणानी पुढील जागी स्थलांतरित करावे. दरम्यान  पोल (खांब ) स्थलांतरित होई पर्यंत सर्वनजीक बांधकाम वडगाव मावळ यांनी या भागात अपघात होऊ नये यासाठी सुरक्षाच्या दृष्टीने या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशी मागणी माजी उपसरपंच रोहिदास असवले, सेवा फा. अध्यक्ष संदीप मालपोटे,गणेश गुरुव, संतोष असवले, ज्ञानेश्वर ढोरे,तानाजी मोरे राघु मोरमारे,गणेश कोकरे, सुमित इंगळे,सोमनाथ कोंडे, शिवाजी शिंदे,गोरख असवले,निलेश जगताप, संतोष कोंडे, संदीप मोरे, आनंद रगपिसे, विकी परदेशी,  सोमनाथ असवले, दत्तात्रय कोंडे, मुन्नावर अत्तार, शंकर जगताप, रोहिदास मुऱ्हे, हरिभाऊ गरुड, प्रभू मालपोटे, यांनी केली आहे.
माजी उपसरपंच रोहिदास असवले म्हणाले ,”
या मुख्य रस्त्याच्या  दरम्यान अनेक छोट्या मोठ्या कंपन्या  आहेत  व आंदर मावळ मध्ये पर्यटन क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावरती आहे परिणामी  या भागातून हजारो नागरिक रस्त्यावरून प्रवास करत असतात. या भागात कोणतीही हानी होऊ नये यासाठी  सुरक्षितेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ व महावितरण वडगाव मावळ यांनी याठिकाणी उपाय योजना करणे  गरजेचे आहे.

error: Content is protected !!