मावळ तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा : महाविकास आघाडी सहभागी
वडगाव मावळ :
  मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. नोटा बंदी, जीएसटी व अग्निपथ या सर्व फसव्या योजना आहेत. चारित्र्यसंपन्न व्यक्तींना ईडीच्या चौकशा लावून चारित्र्य हनन केले जात आहे. महागाई, बेरोजगारी व विकास असे अनेक  प्रश्न सोडविण्यास मोदी सरकार नापास झाले आहे. मोदी सरकारच्या फसव्या योजना कळल्याने देशात अनेक राज्यांत आंदोलने सुरू आहेत, टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी केली.
पोटोबा महाराज मंदिरापासून मावळ तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाविकास आघाडी वतीने व काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,”
मोदी सरकारने सहायक संस्थांच्या माध्यमातून वापरलेल्या दबाव तंत्रामुळे देश अस्थिर आहे. शेतकरी, उद्योजक, युवकांसाठी फसव्या योजना राबवून त्या योजना फसव्या असल्याच्या जनतेला समजल्याने त्या मागे घेण्याची वेळ मोदी सरकारवर येते.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,तळेगाव शहर अध्यक्ष यादवेंद्र खळदे, पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर,माजी तालुकाध्यक्ष रोहिदास वाळुंज, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव,माजी शहराध्यक्ष संतोष राक्षे,जिल्हा राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे , सरपंच विजय सातकर,माजी सरपंच गणेश दाभाडे,युवक अध्यक्ष विलास मालपोटे,माजी उपसरपंच सुनील भोंगाडे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकर, माजी शहराध्यक्ष गजानन शिंदे, नगरसेवक सुनील ढोरे,ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, माजी सरपंच शांताराम लष्करी, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ उपस्थित होते.

error: Content is protected !!