कामशेत:
कामशेत शहरातील वाहतूक कोंडी सुटता सुटत नाही.शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य परेश बरदाडे यांनी केले.
पोलीस निरीक्षक खडकाळा पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.  कामशेत शहरातील बाजारपेठ काही ठराविक जसे की, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, बँक ऑफ महाराष्ट्र, साई बाबा चौक, गणपती चौक. इत्यादी ठिकाणी ट्राफिक सतत जाम होत आहे.
त्यातच मागील आठवड्यापासून शाळा कॉलेज सुरू झाले आहे शाळा कॉलेज मध्ये शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांना व रेल्वेने येणार्‍या प्रवाशांबरोबर असणाऱ्या लहान मुलांना रस्त्यावरून चालत जाताना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.तरी आपणाला या पत्राव्दारे विनंती करण्यात येत आहे.
वाहतुकीच्या नियमाची शिस्त लाऊन पायी चालणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना/ प्रवाशांना या वाहतुक समस्येपासून कामाचे मुक्त करावे.

error: Content is protected !!