कामशेत:
टाकवे बुद्रुक कान्हे फाटा रस्यावर कायनेटिक कंपनीसमोर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरूणाला पिंटू मानकर या रुग्णवाहिका चालकाने कामशेतच्या महावीर हाॅस्पिटल मध्ये  सोडवले.आणि बेशुद्धावस्थेतील या तरूणावर महावीर हाॅस्पिटलने सलग चौदा दिवस उपचार करून त्याला दोन दिवसापूर्वी घरी सोडले. आठ दिवस बेशुद्धावस्थेतील या तरूणावर उपचार करून त्याला बरा करणे हे डाॅक्टरांटपुढे आवाहन होते.
हे आवाहन महावीर हाॅस्पिटलच्या डाॅ.विकेश मुथा आणि टीमने यशस्वीपणे पेलले. आणि दोन दिवसापूर्वी या तरूणाला सत्कार सन्मान करून घरी सोडले. घरी जाताना या तरूणाच्या डोळयात दिसणारे अश्रू महावीर हाॅस्पिटलच्या कृतज्ञतापूर्तीची साक्ष दिसत होती. नितीन संतोष उपम वय १८ रा.चिखली असे या तरूणाचे नाव आहे.
दिनांक ३.६.२०२२ ला टाकवे बुद्रुक रस्त्यावर झालेल्या अपघातात संतोष जखमी झाला होता. समोरासमोर दोन वाहनांचा झालेल्या हा अपघात जखमी अवस्थेतील संतोषला  महावीर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. बेशुद्धावस्थेत असलेल्या संतोषवर उपचारासाठी येथे दाखल केले याचे कारणही असेच आहे. सर्वाना आपले जवळचे हक्काचे वाटणारे  हॉस्पिटल म्हणून महावीर हाॅस्पिटल कडे पाहिले जाते.
महावीर हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर डाॅ.विकेश मुथा यांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. संतोषच्या कानातून रक्त वाहत होते.बेशुद्धावस्थेत तो  तसाच  वेळ पडून होता.त्याच्या दोन्ही बरगड्यांना दुखापत झाली होती. डाव्या खांद्याचे हाड फॅक्चर होते. तोंडाला मार लागला होता. डोक्याला ही मार होता. मेंदूतून रक्तस्त्राव होत होता.लिव्हरला जखम झाली होती. मणक्याला मार लागला होता.
डाॅ.विकेश मुथा यांनी  प्राथमिक औषधोपचार सुरू केला.संतोष ला ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. डाॅ.विकेश मुथा आणि टीमची देखरेख सूरू होती. पाच ते सहा दिवस तसाच बेशुद्ध अवस्थेत होता. नंतर हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. अत्यंत सिरियस असा पेशंट महावीर हाॅस्पिटलच्या अपातकालीन विभागात भरती होता. त्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत अतिदक्षता विभागात त्यावर उपचार सुरू होते. खांद्याचे,तोंडाची,छातीची शस्त्रक्रिया केल्या. मेंदूला योग्य योग्य औषधोपचार झाल्याने नितीनच्या तब्येत फरक जाणवू लागला. सर्व शस्त्रक्रियेनंतर नमस्कार त्याला डिस्चार्ज देण्यात आला. संतोषने जाताना महावीरच्या स्टाफचे आभार मानले.

error: Content is protected !!