वडगांव मावळ:
वडगाव मावळ  शहराची सुकन्या प्राजक्ता बाळकृष्ण दुगम वय वर्षे ३६ ही सध्या हदय व फुफ्फुसाच्या आजाराने खूप त्रस्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्ता नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे वास्तव्यास असून जीवन जगण्याच्या धडपडीत प्राजक्ता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कृत्रिम ऑक्सिजन मशीन लावून नोकरी करतीये सलाम तिच्या जिद्दीला.. सध्या तिच्यावर पुण्यातील डॉ.डी.वाय पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
परमेश्वराच्या कृपेने तिला जीवन जगण्यासाठी एक संधी मिळाली आहे. कृत्रिम ऑक्सिजन ते सर्वसामान्य जीवन ज्यात मोकळा श्वास ते विना मशीन श्वास घेता येण्याची एक आशा निर्माण झाली आहे.प्राजक्ता वर उपचार करण्यासाठी जवळपास ६५ लाख रुपयांची गरज भासणार आहे यात तिचे हृदय व फुफ्फुस हे दोन्हीही अवयव बदलले जाणार आहेत याकरिता आता तिला गरज आहे ती आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, शुभेच्छांची आणि सर्वात जास्त म्हणजे अर्थिक मदतीची..
नगराध्यक्ष मयूर ढोरे स्वता काही प्रमाणात कर्तव्यरुपी मदत करत असून शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो कि, प्राजक्ताला तुमच्या मदतीची खूप मोठी गरज आहे. तुमच्या मदतीचा एक हात तिच्या जीवनदानात फार मोठा वाटा उचलेल.
नगराध्यक्ष मयूर ढोरे म्हणाले,”  आपण खालील क्यू आर कोड वर ऐच्छिक स्वरुपात मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.प्राजक्ताला पुन्हा एकदा सर्वसामान्य आयुष्य जगण्यासाठी अनमोल असा श्वास घेण्यासाठी आपापल्या परीने कर्तव्य रूपी मदत करावी जेणेकरून आपणा सर्वांच्या मदतीच्या रूपातून ती पुन्हा एकदा नव्या उमेदीने जीवनाचा आनंद घेऊ शकेल.

error: Content is protected !!