स्वदेशी अपनाये, देश बाचाये स्वदेशी अपनाये, निरोगी जीवनपाये!स्वस्थ ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ विभागातील महिला व पुरुषांना इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन प्रा.लि कंपनीच्या केमिकल मुक्त भारत आरोग्य अभियान अंतर्गत मोफत स्वयंरोजगार, लघु उद्योग निर्मिती आरोग्य तपासणी व आत्मनिर्भर कार्यशाळा व सेंद्रिय शेती मार्गदर्शन ग्रामपंचायत कार्यालय मध्ये करण्यात आले.
  कार्यक्रमाचे उद्घाटण   ग्रुप ग्रामपंचायत सरपंच  भूषण असवले यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच परशुराम मालपोटे होते.
आरोग्य विषयक माहितीसाठी प्रमुख मार्गदर्शन डॉ. प्रतापरावजी पवार (आयुर्वेदाचार्य क्राउन प्रेसिडेंट IMC), डॉ. संदेश शहा   डॉ. प्रियंका शहा,  डॉ. राधिका शहा (स्त्री रोगतज्ञ) (सेंद्रिय शेती तज्ञ  ) यांनी केले.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होते मोफत आरोग्य तपासणी करणे .या कार्यक्रमाअंतर्गत या  भागातील सर्व महिला व पुरुषांनी अवश्य तपासणी करून  घेण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत टाकवे  बुद्रुक कडून प्रोस्थान करण्यात आले होते. तसेच औषधे व गोळ्या, सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, या आरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत टाकवे बु. तसेच या भागातील अनेक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!