निगडे:
निरक्षर राहून अंधारात राहण्यापेक्षा सुशिक्षित होऊन उजेडात येणं कधीही चांगलं  असे मत निगडेच्या  सरपंच सविता भांगरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी निगडे या शाळेचा  या  शैक्षणिक वर्षांचा प्रवेशोत्सव समारंभा प्रसंगी  सरपंच भांगरे बोलत होत्या. आजपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या याच पार्श्वभूमीवर शाळेत आज नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि मिठाई देऊन त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा देताना सरपंच सविता भांगरे यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी निगडे गावचे उपसरपंच श्री रामदास चव्हाण यांनी ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व  विद्यार्थी उत्साहात दिसत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री भाऊसाहेब थरकुडे, मनीषा ठाकर, सीताराम ठाकर,  माजी सरपंच सोपान ठाकर, युवा कार्यकर्ते बाळू ठाकर, दिलीप ठाकर, दत्ता ठाकर, सविता ठाकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवप्रकाश खोब्रागडे सर यांनी केले तर आभार श्री. श्रीनिवास शिंदे यांनी मानले.

error: Content is protected !!