महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे:
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रम शाळा कामशेत येथील शैक्षणिक वर्षाचा प्रवेश उत्सव कार्यक्रम संपन्न झाला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण माननीय नवनाथ भवारी तसेच महर्षी कर्वे श्री़. शिक्षण संस्थेचे उपसचिव श्री. प्रदीपजी वाजे शाळा समिती सदस्य श्री. धनंजय वाडेकर, विक्रमशेठ बाफना तसेच ग्राम प्रबोधिनी चे माजी मुख्याध्यापक श्री भदाणे सर व शाळेतील सर्व पालक विद्यार्थी शिक्षक वृंद कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
नवागतांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले यामध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थ्यांना फुलांच्या पायघड्या घालून तसेच त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन व औक्षण करून त्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून आलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे आम्ही आमच्या महर्षी कर्वे आश्रम शाळेच्या संस्थेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलेले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित असलेले सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण श्री. नवनाथ भवारी सर यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांनी  लोक डाऊन नंतर ची शाळा त्याचे महत्त्व ऑनलाइन शिक्षणातील त्रुटी आणि प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व आदिवासी समाजासाठी संस्थेचे मोठे योगदान आहे आणि राज्या
तील ५३० आदिवासी आश्रमशाळा  पैकी महर्षी कर्वे आश्रम शाळा ही सर्वोत्कृष्ट शाळेपैकी एक आहे. असं कौतुक त्यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पंढरीनाथ वाडेकर यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती देवरे मॅडम यांनी केले .
व आभार प्रदर्शन श्री. तुकाराम पवार यांनी केले.

error: Content is protected !!