टाकवे बुद्रुक :
वेळ सकाळी ७ वाजताची… टाकवे बुद्रुकच्या कायनेटिक कंपनीसमोर दोन दुचाकींचा अपघात होतो… मदतीसाठी कोणीही पुढे जात नाहीत… जखमी अपघातग्रस्त मदतीसाठी याचना करत असतात… अपघाताची ही बातमी टाकवेचे विद्यमान सरपंच भूषण असवले यांच्या कानावर पडते… आणि जॉगिंग करण्यासाठी गेलेले सरपंच स्वतः रुग्णवाहीका चालवत घेऊन त्याठिकाणी हजर होतात… व अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहचवण्यास मदत करतात…
टाकवे बुद्रुक येथील औद्योगिक क्षेत्रात ता. 5 जून रोजी सकाळी सात दोन दुचाक्या समोर धडकून अपघात झाला. यात एका दुचाकीवर तिघेजण तर दुसऱ्या एका दुचाकीवर एक जण होता. या अपघातात दुचाकीवर असलेले चौघेहीजण गंभीर जखमी झाले तसेच दुचाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चौघेही मदतीसाठी याचना करत होते मात्र मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. तसेच सकाळची वेळ असल्याने सर्वजण ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त होते. टाकवे गावचे  सरपंच भूषण असवले यांना ही बातमी समजली आणि स्वतः ते रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी दाखल झाले. चारही अपघातग्रस्त व्यक्तींना त्यांनी रुग्णवाहिकेत घेऊन त्यानी अपघातग्रस्तांना कामशेत मधील एका दवाखान्यात तर बाकीच्या तिघांना जनरल हॉस्पिटल मध्ये पोहचवण्यास मदत केली व डॉक्टरांना लवकरात लवकर उपचार करण्यास विनंती केली.
अपघातग्रस्तांना घटनास्थळी मदत करण्याऱ्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती पोलीस प्रशासनाला तसेच रुग्णालयात द्यावी लागेल तसेच अशा प्रकारच्या घटनेत अजून काही अडचण निर्माण होईल ह्या कारणाने आजकल नागरिक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत. उलट त्यांचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध करतात. मात्र, टाकवेचे सरपंच ह्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले आहे. अपघातग्रस्तांना मदत करून त्यांनी एक वेगळाच आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
सरपंच भूषण असवले म्हणाले,”
“आजकाल लोकं कोणी कोणाला मदत करत नाही. अक्षरशा लोक त्याठिकाणी तमाशा पाहत होती. त्यांना  मदतीची याचना केली  तेव्हा त्यांनी अपघातग्रस्तांना उचलण्यासाठी मदत केली. अपघात झाल्यावर लोकांनी स्वतःची अडचण न पाहता अपघातग्रस्तांचा जीव पाहिल्यांदा पाहिला पाहिजे.

error: Content is protected !!