टाकवे गावचे सरपंच भूषण असवले यांनी पाणी टंचाई  समस्येचे  केले निवारण
टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक येथील ग्रामपंचायत हद्दीमधील, माऊली नगर, सरकारी हॉस्पिटल परिसर ,घोणशेत रोड येथील धनवेवस्ती, दत्तनगर,, वाघमारे वस्ती या भागात कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे.
त्यामुळे या भागातून  पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली होती . कमी दाबाने पाणी येत असल्याने पाईपलाईनच्या बाजूला खड्डा घेऊन तेथून पाणी भरण्याची वेळ महिलांवर आली होती .
फळणे व वाघमारे वस्ती या भागात देखील पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होत नव्हता तसेच  अवेळी पाणी येत होते .ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुकचे  कार्यक्षम धडाडीचे सरपंच भूषण असवले व त्यांच्या सर्व  सहकाऱ्यांनी समस्यांची तत्काळ दखल घेऊन, पाण्यासंदर्भात होणाऱ्या सर्व समस्यांचे निवारण केले आहे.
त्यामुळे टाकवे  परिसरातील नागरिकांनी ग्रुप ग्रामपंचायत तसेच कार्यक्षम सरपंच भूषण असवले यांचे आभार व्यक्त केले आहे. पाणी भरपूर वेळ व जास्त दाबाने येत असल्याने महिला वर्गामध्ये  समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!