२८ वर्षांनंतर भेटले अन सारेच भारावले
प्रजाली गुजराणी यांच्या पुढाकाराने न्यू इंग्लिश स्कुलच्या १९९३-९४ बॅचचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आले एकत्र
वडगाव मावळ:
शिक्षकांचा सन्मान, विविध खेळ, गप्पा गोष्टी आणि जुन्या आठवणींना उजाळा देत येथील न्यू इंग्लिश स्कुलमधील १९९३ – १९९४ च्या दहावीतील विद्यार्थी – विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले अन तब्बल २८ वर्षानंतर सर्वजण एकत्र आल्याने भारावून गेले.
ब्राम्हणवाडी येथील स्वागत हॉटेलमध्ये प्रजाली गुजराणी यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलनाचा शुभारंभ शिक्षक अमीन खान, प्यारेलाल शेख, आयुब पिंजारी, वनराज ढोरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय, सरस्वती माता व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आला. दुपारच्या सत्रात शिक्षक निलेश उबाळे, नेवसे, शिंगे, पासलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी – विद्यार्थिनींपैकी सामाजिक बांधिलकी ठेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेले सचिन ढोरे, किरण भिलारे, हेमंत काकडे, पद्मावती ढोरे, विलास नवघणे, संजय जायगुडे, गणेश विनोदे यांचा तसेच २८ वर्षांनी सर्वांना एकत्र आणणाऱ्या प्रजाली गुजराणी व ज्योती सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 
उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकमेकांशी मनसोक्त गप्पा गोष्टी करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, एकमेकांची आपुलकीने विचारपूस करत नव्याने ओळख करून घेतली. तसेच विविध खेळ व आपले कला गुण सादर करत या स्नेह संमेलनाचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांना आठवण म्हणून सर्वांचा एकत्रित फोटो भेट म्हणून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रजाली गुजराणी यांनी केले, सूत्रसंचालन गणेश विनोदे यांनी केले, दिवंगत शिक्षक, विद्यार्थी यांना नितीन चव्हाण यांनी श्रद्धांजली समर्पित केली, तर आभार अजय धडवले यांनी मानले. प्रजाली गुजराणी, ज्योती सोनवणे, वसंत तुमकर, नितीन चव्हाण, गणेश विनोदे, विश्वास ठाकर, अविनाश कुडे, अजय धडवले, दीपाली घोलप, कुंदा चव्हाण यांनी संयोजन केले.
या स्नेहसंमेलनास अजित गरुड, गणेश तांबे, सुहास क्षीरसागर, नितीन बाफना, कुलदीप पाळेकर, संजय आढाव, श्रीराम ढोरे, विवेक गाडे, राहुल कर्णावट, संदीप फुलपगर, संजय ओव्हाळ,  संतोष ओझरकर, श्याम कराळे, राजेश भिलारे, भगवान टेमघरे, बापू भोर, प्रदीप गाडे, संतोष गायकवाड, अंकुश पवार, बाळासाहेब शिंदे, सचिन सावंत, रावसाहेब सुरवसे, सुनिल चव्हाण, राहुल ढमाले, अजय ओसवाल, निलेश भोकसे, संदीप ओसवाल, धनंजय महाजन, अभिजित कुलकर्णी, दीपाली म्हाळसकर, आरती चव्हाण, मोहिनी खांदवे, सारिका सोलंकी, संजीवनी परदेशी, रतन कुंभार, समिता तुपे उपस्थित होते.

error: Content is protected !!