वडगाव मावळ :
वडगाव येथील एका युवकाची सोमवारी (दि. १३) मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास लोखंडी कोयते व तलवारीने डोक्यात आणि अंगावर वार करून निर्घृणपने हत्या केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी महेश काशिनाथ गायकवाड ( वय २८, रा. वारंगवाडी) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.विश्वजित राजेंद्र देशमुख (वय २२, रा. संस्कृती सोसायटी वडगाव ता.मावळ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावच्या हद्दीतील मातोश्री हॉस्पिटल जवळील बस स्टॉप समोर रोडवर पुर्वी झालेल्या कुठल्यातरी भांडणाच्या पूर्ववैमनस्यातून सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास १० ते १२ अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येवुन त्यांचे हातातील लोखंडी कोयते व तलवारीने विश्वजीत देशमुख याचे डोक्यात, पाठिवर वार करून त्यास जिवे ठार मारले .
तसेच सदराची भांडणे सोडविण्यास गेलेल्या महेश गायकवाड (रा. वारंगवाडी) व अभिशेख अनंता ढोरे याचेवर देखील त्यांनी कोयत्याने व तलवारीने वार करून त्यांना जखमी केले आहे. तसेच त्यांच्या गाडयांची तोडफोड करून नुकसान केले असल्याची महेश गायकवाड याने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी प्रत्येक्ष भेट देऊन पंचनामा करण्यात आला असून या गुन्ह्यातील पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले हे करत आहेत.
मागील काही दिवसांत वडगांव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही खुनाची दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वडगाव मध्ये पोलिसांची दहशत नसल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

error: Content is protected !!