वडगाव मावळ:
आमदार सुनील शेळके यांच्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान फंडातून व नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मध्ये सुमारे १ कोटी १८ लक्ष रुपये आणि प्रभाग क्रमांक २ मध्ये सुमारे ४९ लक्ष ५ हजार रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन शुभारंभ नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, संत तुकाराम साखर कारखाना संचालक सुभाषराव जाधव, माजी सभापती गणेश आप्पा ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम उर्फ बुवा ढोरे, जेष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, जेष्ठ नेते सुनील चव्हाण, प्रगतशील शेतकरी विष्णू तात्या ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक सुनिल ढोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक दिनेश ढोरे, रा. काँ. शहराध्यक्ष प्रविण ढोरे, सामाजिक कार्यकर्ते नंदुभाऊ ढोरे, प्रभाग अध्यक्ष प्रकाश ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
येत्या पाच ते सहा दिवसात प्रभाग क्रमांक दोन व सतरा मधील खालील विकासकामांना सुरुवात होईल.
• मोरे डेअरी ते शिवआंगण अपार्टमेंट रस्ता कॉक्रीटीकरण करणे. २९,३४,०००/-
• गिरी पोल्ट्री रस्ता कॉक्रीटीकरण करणे. ३२,८४,०००/-
• सिद्धार्या बिल्डींग ते प्रथमेश अपार्टमेंट ते आंनदी वास्तु ते रामदास ढोरे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे. ५६,३४,०००/-
•  स्वप्नील अमृतकर यांचे घर ते ॲड संदिप वाघ याच्या घरापर्यंत रस्ता रुंदीकरण करणे. १९,८५,०००/-
• अष्टविनायक काॅलनीतील अंतर्गत रस्ते व बंदिस्त गटर करणे. २९,२०,०००/-
प्रभागातील विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात करत असताना रस्त्याची कामे उच्च दर्जाची करावीत अशा सूचना संबधित ठेकेदाराला नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिल्या. तसेच याव्यतिरिक्त येणाऱ्या काळात या दोन्ही परिसरात अजून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी या भागातील नागरिकांना दिले. यावेळी प्रभागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!