वडगाव मावळ:
इनरव्हील क्लब निगडी प्राईडच्या वतीने स्वराज्य शेतकरी बचत गटासाठी पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
मावळ तालुक्यातील आदिवासी डोंगरी दुर्गम भागातील पिंपरी बु.येथील स्थापन केलेल्या स्वराज्य शेतकरी बचत गटाने अभिनव उपक्रम राबवून गटशेती साठी प्रयत्न करीत असताना पाणी पुरवठा ही मोठी आडचण होती परंतू इनरव्हील क्लब निगडी प्राईड च्या अध्यक्षा निर्मल कौर यांचे प्रयत्नातून क्लब च्या वतीने सदर पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास सात लाख रू खर्च करुन ही योजना पुर्ण केली.
या मुळे पिंपरी ग्रामस्थ व परिसरातून क्लब पादाधिकार्यांचे आभार व्यक्त होत आहेत.ही योजना साधारण 200 मीटर खोल तर 1200 मीटर एवढे लाब अंतर असून या साठी शेतकरी परीवातील लोकांनी श्रमदान केले आहे. तर क्लब ने निधी उपलब्ध करून दिला आहे.या मुळे या शेतकरी गटातील जवळपास 200 लाभार्थींना याचा लाभ मिळणार आहे.रोजगाराची एक उत्तम संधी या निमित्ताने शेतकर्यांना मिळाली असून जमीन बागायतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न देणारी पिके घेता येतील असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केले.
ही योजना साकार होण्यासाठी क्लबच्या अध्यक्षा निर्मल कौर यांनी विशेष प्रयत्न केले तर क्लब पदाधीकारी सेक्रेटरी सुजाता ढमाले, प्रणिता आलुरकर,खजीनदार डाॅ.रंजना कदम,कमलजीत कौर,सुवर्णा जांभूळकर,सवीता राजापूरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी पास्ट आसोसीएन प्रेसीडेंट सवीता पिंगळे,डीस्ट्रीक्ट चेअरमन इलेक्ट मुक्ती पाणसे यांनी आपले मनोगतातून शेतकर्यांनी मेहनत करून  चांगले उत्पन्न घ्यावे व योजनेचे जतन व्यवस्थीत करावे असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी गुरदिपसींग,हरवींदर सींग,राजेश गायकवाड,मा.सरपंच राजेश कोकाटे,सरपंच रोहीनी कोकाटे,दुंदा वासावे,लहू पिंपरकर,धनराज कोकाटे लताबाई पिंपरकर,ताईबाई पिपरकर तुळसाबाई पिपरकर,चितामन कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटन कार्यक्रमचे प्रास्तावीक निर्मल कौर यांनी केले सुत्र संचलन कमलजीत कौर यांनी केले आभार संरपंच रोहीनी कोकाटे यांनी माणले सदरचा  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल पिंपरकर अंकुश पिपरकर आणि गटातील शेतकरी यांनी नियोजन केले.

error: Content is protected !!