
वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन सरचिटणीस पदी रामदास जाखोबा वाडेकर यांची निवड करण्यात आली. मावळचे आमदार सुनिल (अण्णा)शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते राज खांडभोर, आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रूपेश घोजगे,सरचिटणीस संतोष नरवडे,माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,माजी सरपंच दत्तात्रय पडवळ,अनिल मालपोटे, सरचिटणीस महेश बेंजामिन उपस्थित होते.
रामदास वाडेकर हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात आहे. रामदास वाडेकर यांनी यापूर्वी पक्ष संघटनेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून( २००३)ला ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस(२००९),राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख(२०१४) म्हणून काम केले आहे.
- महावीर हाॅस्पिटल येथे डाॅक्टर डे साजरा
- रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विकेश कांतीलाल मुथा
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप










