मुंबई:
  मुंबईतील कॅान्वेंट शाळेमधील डबे  पोहचवण्यास प्रवेश मिळावा अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली. असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
मुंबई मधिल बहुतांश कॅान्हेंट शाळे मधील विद्यार्थ्यांना डबेवाला कामगार गेली कित्येक वर्ष जेवणाचे डबे पोहचवत आला आहे. ही परंपरा किमान शंभर वर्ष तरी जुनी आहे. परंतु अलिकडच्या काळात शाळा मॅनेजमेंन्ट यांनी शिक्षणाचा व्यवसाय मांडला आहे की काय अशी शंका येते आहे.
शाळा व्यवस्थापन फतवे काढते विद्यार्थ्यांनी कपडे,वह्या, पुस्तेके, शालेय साहीत्य शाळेतून घ्यावे.
ह्या शाळेतील साहीत्याच्या किंमती बाजार भावा पेक्षा दुप्पट असतात. पण शाळा व्यवस्थापनाशी वाद नको म्हणुन पालक हे साहीत्य नाईलाजाने शाळेतुन घेतात कारण त्यांचा पाल्य त्या शाळेत शिकत असतो.मध्यंतरी काही शाळांनी फतवा काढून शाळेत येणारे डबेवाले सुरक्षेच्या कारणा वरून बंद कले आणी शाळेत जर विद्यार्थ्यांना काही खायचे असेल तर त्यांनी शाळेच्या कॅन्टिंग मध्ये जावून खावे असे सांगितले.
म्हणजे येथे ही कॅन्टिंगवाल्याचा धंधा कसा होईल हाच विचार दिसून येतो. तेव्हा ही आमचे म्हणने होते की आमच्या मुळे कधीही कोठलीच सरक्षा कधी धोक्यात आली नाही आणी ना कधी आम्ही ती धोक्यात येऊ देणार नाही. तुमचा नियम आहे तो आम्हाला मान्य आहे. पण ज्या विद्यार्थीला घरचा डबा खायचा असेल तर त्याला तरी आम्हाला डबे पोहचवू द्या ! पण तेथे ही नकार घंटा मिळाली.
गेली दोन वर्ष करोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा बंद होत्या शाळेत डबे पोहचवणारा डबेवाला कामगार बेरोजगार होता आता जुन महीन्यात शाळा चालू होऊ लागल्या आहेत. तर करोनाच्या पार्श्वभुमीवर शाळांनी डबेवाल्यांना शाळेत प्रवेश नाकारत आहेत.
साहेब,शाळेत साधारणत हजार, दोन हजार विद्यार्थी असतात. त्यांचे पालक त्यांना शाळेत सोडण्यास / घेण्यास येतात त्यांचा कोणाशी संपर्क येत नाही का ? मग डबेवाला कामगाराला शाळेच्या प्रिमायसीस मध्ये येण्यास मनाई का ? बर डबेवाला शाळेत डबे घेऊन येतो तो काही विद्यार्थींना वर्गात जावून डबे वाटत नाही तर शाळेच्या आवारात शाळा प्रशासन सांगेल तेथे तो डबे ठेवतो विद्यार्थी ते डबे घेऊन जातात व जेवल्यावर तेथे परत रिकामा डबा आणुन ठेवतात मग डबेवाला रिकामे डबे घरी पोहच करतो. तरी ही करोनाच्या पार्श्वभुमीवर त्याला शाळेत डबे पोहचवण्यास मनाई करण्यात येते आहे.
आमच्या कडून शाळेची सुरक्षा कधीच धोक्यात येवू शकत नाही. तसेच करोना बाबतची महाराष्ट्र सरकार जे सुचना देते त्याचे  आम्ही पालन करतो मग डबेवाला कामगार याला शाळेत डबे पोहचवण्यास मिळायला काय हरकत आहे. या बाबत आपल्या शासनाने शाळा व्यवस्थापन आणी शाळेत डबे पोहचवणारे डबेवाले कामगार यांची बैठक लावून यातून मार्ग काढला पाहीजे नाही तर शाळेत डबे पोहचवणारे आमचे डबेवाले कामगार बांधव यांचा रोजगार बुडेल  असे निवेदन सुभाष तळेकरअध्यक्ष मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी दिला आहे.

error: Content is protected !!