वडगाव मावळ:
नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या  स्वखर्चाने वडगांव शहरातील नागरिकांना वृक्षसंवर्धन वाढीसाठी २००० झाडांचे वाटप. निमित्त होते जागतिक पर्यावरण दिन व मावळ तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या वाढदिवसाचे.
आमदार सुनील आण्णा शेळके व सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना
“मागेल त्याला मोफत झाड” हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत मोफत दोन हजार फळ व फुल झाडांचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सभापती बाबुराव आप्पा वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, संचालक सुभाष जाधव, ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, सुनील ढोरे, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम कुडे, रा कॉ.अध्यक्ष प्रवीण ढोरे, रा. काँ. युवक अध्यक्ष अतुल वायकर, रा. का. प्रवक्ते राजुभाऊ खांडभोर,सिद्धेश ढोरे,भाऊ ढोरे, विकी भोसले, गणेश जाधव, विशाल वहिले, अनिल दंडेल, यशवंत शिंदे आदी मान्यवर व शहरातील नागरिक झाडे घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा स्वच्छता अभियानात वडगाव नगरपंचायत चा संपूर्ण राज्यात सहावा क्रमांक आल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत वडगाव नगरपंचायत मधील स्वच्छता अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.
शहरातील नागरिकांनी आपापल्या परिसरात वृक्षसंवर्धन वाढीसाठी सर्वांनी झाडे लावणे काळाची गरज आहे. अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयुरजी ढोरे यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!