
मावळमित्र न्यूज विशेष :
सामाजिक कार्याचा वसा जपत..राजकारणाच्या क्षितिजावर एकनिष्ठेचा वारसा जपणारे गणेश वसंतराव खांडगे यांचा राजकीय दबदबा सर्वश्रुत आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन स्वतःची वेगळी छबी निर्माण करणारे गणेश खांडगे यांच्या पाठीशी राजकीय आणि सामाजिक कार्याचे भले मोठे वलय आहे.अंत्यत संयमी आणि तितकेच सुस्वभावी असणारे गणेश भाऊ कितीही मोठे वादळ आले,तर त्यात न डगमगता खंबीर पणे उभे राहिले.
आनंदाची कितीही मोठी भरती आली ,किवा अपयशाची ओहोटी आली .तरी ती तितक्याच संयमाने झेलणारे बंधुत्वाचे गोड नातं जपणारे हे नाव .आमच्या सारख्या शेकडो तरूणांच्या हदयावर कोरले आहे. त्यांचा राजकीय व सामाजिक कारकीर्दचा पिंड आहे. सामजिक कामाचा वारसा त्यांनी त्रिदल पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन सुरू केला.
मावळभुषण पुरस्कार, कृषीभुषण पुरस्कार, रक्तदान
शिबीरे, मोफत नेत्रतपासणी, मोफत चष्मेवाटप शिबीरे,मॅरेथॉन स्पर्धा यासारखे विविध उपकम राबवून त्यांनी तरूण पिढीला राजकारणाचे धडे दिले.गणेश भाऊंच्या प्रत्येक उपक्रमाची व कार्यक्रमाची उंची कायमच वाढत गेली.त्यांच्या पाठीशी स्व.मामासाहेब खांडगे यांचे मोठे वलय आहे. लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मातोश्री स्व.शारदाताई पवार यांचे समवेत गणेश भाऊ यांचे आजोबा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व. मामासाहेब खांडगे यांनी पुणे जिल्हा लोकल बोर्डावर सदस्य म्हणून त्यांनी मावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.
भाऊंचे वडील मा.श्री. वसंतराव खांडगे यांनीही तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये ‘नगरसेवक’ म्हणुन काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. आजोबा व वडील यांच्या विचारांचा वारसा ते जपत आहेत. गेल्या तीस वर्षापासून गणेशशेठ राजकारणात सकीय सहभागी आहे .लोकनेते मा.शरदराव पवार साहेब व मा. ना. अजितदादा पवार यांच्या विचारांची प्रेरणा घेवून सार्वजनिक जीवनात काम करत असताना ८0% समाजकारण व २0% राजकारण या न्यायाने त्यांचा सार्वजनिक स्वरूपातील सहभाग आजपर्यत त्यांनी जपलेला आपण सर्व पाहत आहोत .
भाऊंनी,तळेगाव दाभाडे येथे मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था १९९६ मध्ये सुरू केली. या संस्थेचे मा. ना. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशुभहस्ते उदघाटन झाले . गेली २५ वर्ष या पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ते सक्षमपणे संभाळत आहे. सुरवातीपासुन पतसंस्थेला सतत ऑडीट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे .या पतसंस्थेस अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व पुणे जिल्हा बँकेचेही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पतसंस्थेचे व्यवस्थापन व संचालन उत्तम असल्यामुळे त्यांना पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन व महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन वरही ‘संचालक’ म्हणुन त्यांना काम करण्याची संधी मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासुन कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या कामात सक्रीय सहभागी असलेल्या भाऊंचे संघटन कौशल्य आपण जाणतो आहोत. याच संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक मित्र व सवंगडी मिळवले आणि ते जपले हे नव्याने सांगण्याची गरज नाही.तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतलेल्या भाऊंनी या पदाची उंची वाढवली. शिवाय अनेक तरूण पिढीतील कार्यकर्त्यांना संधी देऊन नेतृत्वाची पाठशाळा भरवली. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी ३ हजारापेक्षा अधिक दुचाकी वाहनांचा सहभाग असणारी भव्य क्रांतीज्योत रॅलीचे देहुरोड ते लोणावळा असे केलेले नियोजन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सण समारंभ आणि उत्सवापेक्षा कमी नव्हते.
लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने देशस्तरीय व राज्यस्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धा,कब्बड्डी स्पर्धा सातत्यपूर्ण घेतल्या.युवकांना आकर्षित कारणारे कार्यकम केल्याने मोठया प्रमाणात युवक संघटना तालुक्यात उभी राहिली. यातील बहुतांश कार्यकमांना ना. अजितदादांची उपस्थिती राहिलेली आहे. याचबरोबर युवकांचे मेळावे ,प्रशिक्षण शिबीरे यासारखे अनेक कार्यक्रम राबवले.
हे सर्व कार्यक्रम स्वखर्चाने तालुक्यात आपला आमदार नसताना व राज्यातही आपले सरकार नसताना राबवून संघटना टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. गणेश भाऊंच्या सात वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामामुळे गाव पातळीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांची मजबुत फळी सध्याही कार्यरत आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली. तळेगाव दाभाडे येथील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या ‘राष्ट्रीय शिक्षण’ देण्या-या ऐतिहासिक संस्थेचे उपाध्यक्षपदाची धुरा ते संभाळत आहे.
दोन इंजिनिअरींग कॉलेजेस, प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. सामाजिक भावनेतून याच संस्थेच्या कॅम्पस मध्ये असणारी मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कुलच्या (CBSE BOARD, DELHI) शैक्षणिक संकुलात ज्ञानदानाचे पवित्र कार्य नंदादीपाप्रमाणे तेवत आहे. या भव्य वास्तुचे उदघाटन लोकनेते आदरणीय शरदराव पवार साहेबांच्या हस्ते दिनांक 0५ जलै २०१७ रोजी संपन्न झाले. तळेगाव दाभाडे येथे ‘इंद्रायणी विद्या मंदिर’ या नावाची सुवर्ण महोत्सव साजरी करणारी मोठी शिक्षण संस्था आहे. संस्थेमार्फत तळेगावमध्ये इंद्रायणी कॉलेज चालविले जाते. कॉलेजमध्ये आर्टस, कॉमर्स व सायन्सच्या विद्या शाखा, बी.बी.ए, बी. सी.ए त्याचबरोबर औषधनिर्माण शाखा विभागांचे डी.फार्मसी व बी.फार्मसी कॉलेज व एक इंग्लिश माध्यमाची माध्यमिक शाळा व मराठी माध्यमाच्या दोन माध्यमिक शाळा आहेत.या नामवंत शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचा ‘संचालक’ म्हणुन ते काम पहात आहे.
या सर्व संस्थांमध्ये मावळ तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील जवळपास २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
तळेगाव जनरल हॉस्पिटल अॅण्ड कॉन्व्हलसंट होम आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणारी मोठी संस्था आहे.या संस्थेमार्फत गोर गरीब रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जातात.
याच संस्थेचे TGH ONCO CANCER CARE CENTRE नावाचे अदयावत कॅन्सर हॉस्पिीटल उभे रहात आहे. या संस्थेच्या नियामक मंडळात भाऊ उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहे. त्यांचे शिलेदार म्हणून आम्हाला या सर्व कामाचा आदर आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषेदेवर नगरसेवक, उपनगराध्यक्ष, पक्ष नेता व विरोधी पक्षनेता, नगरपरिषेदेच्या शिक्षण मंडळाचा सभापती म्हणून गणेश भाऊंनी केलेले काम आमच्या सारख्या नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ पडल्यावर राजकारणाच्या पलिकडे जाऊन नाते जपणा-या मोठया भावाला भरभरुन शुभेच्छा देणारे शेकडो फोन खणाणले.
तितक्यातच किंबहुना त्याहून अभिनंदनाच्या अधिक पोष्ट सोशल मीडियावर शेअर झाल्या.अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या गणेश भाऊंचा येणारा काळ उज्ज्वल असेलच.शिवाय सक्षम पक्ष संघटनेचे ‘आदर्श माॅडेल असेल. राष्ट्रवादीचा विचार घराघरात आणि मनामनात पोहोचवतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे. भाऊ अध्यक्ष झाले आणि मावळ तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव झाला. अगदी अंतःकरणपूर्वक आलेल्या या शुभेच्छा गणेश खांडगे यांनी तितकाच आदरपूर्वक स्वीकारून आभारही मानले.
शुभेच्छा स्वीकारून शांत बसतील ते गणेशशेठ कसले,अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेतली. आणि मावळ पिंजून काढायला सुरूवात केली. गाव तेथे राष्ट्रवादी घर तेथे कार्यकर्ता ही संकल्पना घेऊन ते गावोगावी गेले.नागरिकांनी या गावभेट दौ-याला भरभरून प्रतिसाद दिला. किंबहुना राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. एक तास राष्ट्रवादी साठी या उपक्रमास कार्यकर्त्यानी गावोगावी बैठका घेतल्या.विकासाची स्वप्न मांडली. गणेशशेठ यांचे उपक्रम एवढ्या वर थांबणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मान अभिमानाने उंचावले असे ‘आदर्श पक्ष संघटना ‘ते बांधतील असा आम्हाला विश्वास आहे. भाऊंनी, पक्षीय पातळीवर कायमच स्पष्टोक्ती भूमिका ठेवली.त्यातून होणा-या परिणामांची मात्र कधीच काळजी केली नाही. या स्पष्टोक्ती मुळे पक्षाला शिस्तीच्या उंबरठ्यावर आणण्यात यश दिसू लागले आहे.
गणेश भाऊ यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडताना हे लेखन अपुरे पडेल. ७ जून भाऊंचा वाढदिवस. आम्हा कार्यकर्त्याची गुरुपौर्णिमा. ज्या दिवशी गुरूला,मित्राला,ज्येष्ठ बंधूला,अंतःकरणा पासून भरभरून शुभेच्छा द्यायचा हा आम्हां मित्र परिवाराचा वीस वर्षापासून रिवाज.याही वर्षी तो तसाच जपला आहे. तालुक्याच्या राजकीय पटलावरील भाऊंचे नेतृत्व त्यांचे शिलेदार म्हणून आम्हाला अभिमानास्पद आहे. या अभिमानासह आमच्या नेतृत्वाला ‘वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा ‘..
(शब्दांकन-विक्रम कदम,मा. चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश)
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे





