महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान २.० स्पर्धेत राज्यात वडगाव नगरपंचायत चा सहावा क्रमांक
मुंबई:
महाराष्ट्र राज्य सरकारचा महत्वकांक्षी असलेला “माझी वसुंधरा अभियान २.०” या स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जागतिक पर्यावरण दिनी ५ जून २०२२ रोजी जाहीर झाला.
यात नव्याने स्थापन झालेली वडगाव नगरपंचायत चा महाराष्ट्र राज्य मध्ये गुण क्रमांकानुसार सहावा तर शासकीय निर्देशानुसार पाच जिल्ह्याचा एक विभाग अशी रचना असलेल्या पुणे विभागात वडगाव नगरपंचायतने चौथा क्रमांक तर पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
केंद्र शासनाच्या सर्व स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेसाठी वडगाव नगरपंचायत स्थापन झाल्यापासून स्वच्छता विषयक कामे तसेच आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली होती.
महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान २.० यामध्ये वडगाव नगरपंचायत सहभागी झालेली होती त्यानुसार शहरात निसर्गाशी निगडीत असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वानुसार पर्यावरण व वातावरणीय बदल या संबंधित स्वच्छताविषयक कामे तसेच उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र राज्यात माझी वसुंधरा अभियान राबवण्यात आलेल्यामध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व अमृत शहरे असे गट होते, या अभियान गट २ म्हणजेच नगरपंचायत गटात राज्यातील एकूण १३७ नगरपंचायतींचा सहभाग होता.
यात वडगाव नगरपंचायतने शहरात देशी प्रजातीच्या एक हजार वृक्षांची लागवड व २ हजार वृक्ष रोपे वाटप, शहरातील दर्शनीय भिंतींवर स्वच्छतेचे संदेश देणारे रंगकाम करणे, जुन्या विहिरी साफसफाई करणे, नाल्यांची स्वच्छता व पुनरुज्जीवन करणे, विहीरीवर कारंजे बसवणे, महादजी शिंदे स्मारक परिसरात सौरऊर्जा वर विद्युत लाईट बसवणे, गुढीपाडवा  दिनी स्वच्छता संदेश मिरवणूक, इलेक्ट्रॉनिक वाहने वापरण्यास प्रोत्साहन देणे, खेळ रंगला स्वच्छतेचा अंतर्गत घरची परसबाग तयार करणे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, घनकचरा व्यवस्थापन ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी नगराध्यक्ष यांनी दिलेली स्वताची जागा, स्चछताविषयक जनजागृती मोहीम, १००० कचरा डस्टबिन पुरविणे, पर्यावरण पूरक चित्रकला, वक्तृत्व व निबंध, मधुमक्षिका पालनपोषण शिबिर आदी स्पर्धांचे आयोजन याचा समावेश आहे.
प्रदुषण मुक्त पर्यावरण पुरक सायकल रॅलीचे आयोजन, शहरातील नागरिकांना सहभागी करून हरित शपथ घेणे, शहर परिसरात नगरपंचायत कर्मचारी यांचे मार्फत नित्यनेमाने साफसफाई करणे. तसेच अशा अनेक उपक्रमात शहरातील नागरिकांना सहभागी करून घेत वडगाव नगरपंचायतने यशाचे शिखर गाठले असून अशा अनेक प्रकारच्या कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत *महाराष्ट्र राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान मध्ये १३७ नगरपंचायतीने मधून आपल्या वडगाव नगरपंचायतने ६ वा क्रमांक पटकाविला आहे.
या सर्व कामात नगरपंचायत मधील सर्व अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी वर्ग हिरिरीने कामात सहभाग नोंदवत असत तत्कालीन मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर बोराडे व उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच वडगावकरांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अशी माहिती वडगांव नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष सौ पूनम जाधव, आरोग्य सभापती श्री राहुल ढोरे यांनी दिली.

error: Content is protected !!