जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करुन साजरा
पिंपरी:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोजे कोयाळी येथील वनजमिनीवरील रिकाम्या जागेत वनपरिक्षेत्र चाकण वनविभाग चाकण,संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर व ग्राम पंचायत कोयाळी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ४० जातीच्या बांबू प्रजातीची लागवड करण्यात आली. या जातींवर संशोधन करण्यात येत आहे.काही दिवसातच चाकण परिसरातील शेतकऱ्यांना बांबु लागवटीचे महत्त्व समजेल.संबंधित शेतकऱ्यांना या बांबू लागवटीचा फायदा होणार आहे.असे श्री एम यु जाधवर वनपरिमंडळ अधिकारी चाकण यांनी सांगितले आहे.सदरची लागवड वाय एस महाजन वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.याच बरोबर कडूनिंब,वड,पिंपळ,हिरडा या जातीच्या वृक्षांच्या जातींचे वृक्षारोपण करण्यात आले.आज एकूण ५०० झाडांचे वृक्षारोपण केले.संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व पटऊन दिले.संस्कार प्रतिष्ठानचे राजेंद्र फडतरे,मनोहर कड,दत्तात्रय देवकर,चिरंजीव सिंह,शुभम लोंढे,कोयाळी गावचे सरपंच सतिश भाडळे,उपसरपंच सुखदेव पांढरे,सदस्य गणेश कोळेकर,विकास भिवरे,आप्पा दिघे,नरहरी दिघे,सोमनाथ भाडळे,अजय टेंगळे,व ग्रामस्थ तसेच महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
याचे संयोजन मा.श्री सातपुते उपवनरक्षक जुन्नर,
श्री पाटील सहा.उपवनरक्षक जुन्नर ,वाय एस महाजन वनपरिक्षेत्र अधिकारी,श्री एस यु जाधवर वनपरिमंडळ अधिकारी आळंदी,श्री ए ए गवळी नियतक्षेत्र अधिकारी,मा रेश्मा गायकवाड इ केले होते.

error: Content is protected !!