तळेगाव स्टेशन:
अपघातात गंभीर रित्या जखमी झालेल्या युवकाच्या मदतीला राष्ट्रवादी धावून आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांनी तळेगाव चाकण रोड वरील अर्थव हॉस्पिटल रुग्णास भेट दिली.आणि गंभीर रित्या जखमी असलेल्या रुग्णास आर्थिक मदतीची गरज ओळखून मदतीचे आवाहन केले.
  मंगळवार दिनांक 31/05/22 रोजी अर्थव हॉस्पिटल जवळ कू. सागर वारे हा रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी उभा होता. एक भरधाव गाडीने जोरात धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्यांच्यावर अर्थव हॉस्पिटल मध्ये icu मध्ये उपचार घेत आहे.त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झालें असून, अजूनही तो गंभीरस्थितीत आहे.
झालेला प्रकार हॉस्पिटल ने पोलीस यंत्रणेला कळवला आहे. परंतु पोलीस कोणताही प्रतिसाद देत नाही.ज्या गाडीने धडक दिली. त्याचा शोध घेऊन त्याचा कडून नुकसान भरपाई घेतली जावी अशी त्याचा आई ची इच्छा आहे. मुलाचे वडिलांचे छत्र हरवल्यामुळे आई एकटीच कमवत आहे.
परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने उपचार करता येत नाही.
घटनेची माहिती भेटताच शारुख शेख अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अल्पसंख्याक तळेगाव दाभाडे कार्याध्यक्ष साहील ईराणी अल्पसंख्याक तळेगाव दाभाडे अध्यक्षा – तळेगाव दाभाडे स्टेशन विभाग श्रुतिका कांबळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस व श्री गणेश निळकंठ गाडे अध्यक्ष -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया उपस्थित होते.
अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अल्पसंख्याक तळेगाव दाभाडे कार्याध्यक्ष साहील ईराणी म्हणाले, ” अपघातग्रस्त तरूणाला आर्थिक मदतीची गरज आहे. सीसीटीव्ही फुटेज वरून वाहनांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस या तरुणाच्या पाठीशी उभी आहे.

error: Content is protected !!