
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताला सजले तळेगाव
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुक्यातील १८० कोटी ५७ लाख रुपयांच्या विविध मंजूर विकासकामांचे भूमिपूजन व शिलान्यास समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (ता.३ जून) ला होणार आहे. दादांच्या,स्वागताला तळेगाव दाभाडे नगरी सजली आहे.आमदार सुनिल शेळके आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची टीम दादांच्या स्वागताला मैदानात उतरली आहे.
लिंब फाटा येथून शक्तिप्रदर्शन करीत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वागत केले जाईल. मारुती मंदिर चौक,जिजामाता चौकातून नगरपरिषद जवळ समारंभ स्थळी वाजत गाजत दादांचे आगमन होईल.
जिजामाता चौकात पुष्पहार घालून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात येणार येथे. आदिवासी नृत्य सादर केले जाणार आहे. ४० कोटी रुपये खर्चाच्या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसह शहरविकासाच्या एकूण ६४ कोटी ६८ लाख ४९ हजार रुपयांच्या विविध मंजूर कामांचे भूमीपूजन झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे.
दादांचे स्वागत करणा-या स्वागत कमानी,पलेक्स, राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे ठिकठिकाणी लावले आहे. शहरी व ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्ते दुचाकी व चारचाकी वाहनातून रॅलीत सहभागी होणार असून टीम राष्ट्रवादीने तशी रणनिती आखली आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




