मावळमित्र न्यूज विशेष:
मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूणाने पोलीस दलात इमाने इतबारे नोकरी करून ‘राष्ट्रपती पुरस्कार ‘मिळवून सेवानिवृत्त घेतली. पोलीस दलाच्या खाकी वर्दीतील हे सद्गृहस्थ आज समाज सेवेचे व्रत हाती घेऊन काम करीत आहे. वृक्षारोपण,पर्यटन,सामाजिक धार्मिक उपक्रमातील हिरीरीचा सहभाग तरूणांना लाजवेल असा आहे.
राष्ट्रपती पारितोषिक विजेते लहू पाटील बुवा ढेरंगे असे या साहेबांचे नाव आहे. तळेगाव स्टेशन येथील स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असलेले ढेरंगे काका परिसरात लोकप्रिय आहे. ज्येष्ठ नागरिकांची संघटना बांधणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक सुख दु:खाचे साक्षीदार असलेल्या ढेरंगे काकांचे ज्येष्ठांत जेवढे मिळणे मिसळणे आहे. तेवढेच तरूण पिढीत सहजतेने वावर असतो. जाता येता प्रत्येकाशी हसून बोलणारे काकांना सोसायटीत मानसन्मान आहे.
  आंबेगाव तालुक्यातील  चिचोंडी देशपांडे येथे त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय.वडील पाटीलबुवा जयसिंग ढेरंगे व आई भामाबाई पाटीलबुवा ढेरंगे मध्यमवर्गीय शेतकरी.
  मुले शिकून सावरून मोठ झाली पाहिजे  हा त्यांचा ध्यास.लहू भाऊ  यांचे शिक्षण  नारोडी तील मुक्ता देवी विद्यालयात दहावी पर्यत झाले .४.११.१९८१ ला पोलीस खात्यात नोकरी मिळाली . मुंबई पोलीस दलात काम केले.
मुख्यालय घाटकोपर व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात  तेहतीस वर्षे नोकरी.
नोकरीत करताना वेळेचे बंधन पाळले,कुटूबियांतील कसलीही अडचण आली तरी कामावर कधीच उशीर केला नाही. ट्रॅफिक असो,पूर येवो काहीही अडचण आली तरी वेळ पाळली.पोलीस दलात जबाबदारीने काम केले. अनेक प्रसंग सहजतेने हाताळले.
काॅन्सटेबल,पोलीस नाईक,हवालदार,सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करीत ३१.५.२०१४ ला घाटकोपर मुख्यालयातून निवृत्ती घेतली.तेही  राष्ट्रपदी पुरस्कार मिळवून.
स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळ काम करताना भजन, किर्तन,धार्मिक स्थळाना भेटी,वृक्षारोपण, सामाजिक कार्यात पुढे आहे.
पत्नी मंजूताई लहू ढेरंगे यांनी खंबीर पाठबळ दिले.गुण्या गोविंदाने कुटूबियांतील मंडळी नांदत आहे. मुलगा
शोधन नोकरी करतोय.  शैलेश इंजिनियर आहे,तोही आपल्या कामात प्रमाणिक पणे कष्ट करतोय. कन्या शुभांगी विकास भालेकर प्राध्यापक तिने पी.एच.डी केली.सुना प्रभा आणि राजश्री याही आनंदाने घराचे घरपण जपत आहे. आदित्य,अर्णव,अन्यय, प्रतुषा,अन्यया या नातवंडांच्या हट्टात आजोबांचा दिवस उजवतो. आणि त्यांचा लाड पुरवताना दिवस मावळतो.
आयुष्यभराच्या सेवेचे पुण्य पदारात घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले ढेरंगे काका कुटूंबवत्सल आहे. आज त्यांचा वाढदिवस,काकांना आरोग्यदायी दीर्घायुष्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..

error: Content is protected !!