मन की बात द्वारे देशातील जनेतेला प्रेरणा
तळेगाव दाभाडे:
मन की बात द्वारे देशातील जनेतेला प्रेरणा देण्याचे कर्तव्यनिष्ठ काम मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीं जी करीत आहे ,असे प्रतिपादन तळेगाव येथील आयोजित मन की बात कार्यक्रमात भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केले.
पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्या द्वारे प्रसारित होणाऱ्या ८९ व्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन तळेगाव मावळ येथे करण्यात आले होते.या प्रसंगी भाजपा मन की बात पश्‍चिम महाराष्ट्राचे संयोजक तथा भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.
मन की बात च्या माध्यमातून गेले 89 महिने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी देशातील जनतेमध्ये प्रेरणादायी जागृती करण्याचे काम करत आहे, मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश-विदेशातील घडत असलेल्या प्रेरणादायी घटना तसेच सामाजिक काम या कार्यक्रमाद्वारे अखंडपणे प्रसारित होत असते, याला सर्वदूर नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, आज मावळ वासियांनी हा कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये चांगला संदेश दिला आहे.
भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने राष्ट्रनेते पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा “मन की बात” चा विशेष कार्यक्रम आज रविवार दि.२९/०५/२०२२ रोजी सकाळी ११ वा.समाजमंदिर,कडोलकर कॉलनी येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव,पश्चिम महाराष्ट्र मन की बात संयोजक मा.अमितजी गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
माजी राज्यमंत्री मा.बाळाभाऊ भेगडे,जिल्हाध्यक्ष मा.गणेशजी भेगडे,यांनी मार्गदर्शन केले.प्रास्तविक शहराध्यक्ष श्री.रविंद्र बाळासाहेब माने यांनी केले.सूत्रसंचालन सरचिटणीस प्रमोद देशक,स्वागत शक्तीकेंद्रप्रमुख श्री.अमेय झेंडआणि आभार प्रदर्शन मन की बात संयोजक श्री.हिम्मतभाई पुरोहित यांनी केले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष श्री.रविंद्रनाथ दाभाडे,तळेगाव दाभाडे नगरीचे संस्थानिक श्री.सत्यशीलराजे दाभाडे सरकार,किसान मोर्चा प्रदेश सचिव श्री.संतोष दाभाडे,जिल्हा कोषाध्यक्ष श्री.इंदरशेठ ओसवाल,उपनगराध्यक्ष श्री.सुशील सैंदाणे,गटनेते श्री.अरुण भेगडे,नगरसेवक श्री.अमोल शेटे,नगरसेविका सौ.शोभाताई भेगडे,सौ.प्राचीताई हेंद्रे,जिल्हा सचिव श्री.संजय वाडेकर,जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोक काळोखे,भाजयुमो अध्यक्ष श्री.अक्षय भेगडे,माजी नगराध्यक्षा श्रीमती मीराताई फल्ले,माजी नगरसेवक श्री.श्रीराम कुबेर,सोशल मिडीया अध्यक्ष श्री.उपेंद्र खोल्लम,कार्याध्यक्ष श्री.सचिन भिडे,व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री.निर्मलशेठ ओसवाल,ओबीसी कार्याध्यक्ष श्री.सचिन जाधव,सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष श्री.गणेश उंडे,उपाध्यक्ष श्री.शेखर चौधरी,सरचिटणीस श्री.आशुतोष हेंद्रे,महिला मोर्चा सरचिटणीस सौ.तनुजाताई भेगडे,सौ.मृदुलाताई भावे,उपाध्यक्षा श्रीमती ज्योतीताई वैद्य,सौ.आरतीताई वाडेकर,श्री.वैभव कोतुळकर,श्री.ललित गोरे,श्री.आनंद दाभाडे,श्री.आप्पाराव ऐनापार्थी,श्री.अरुण हेंद्रे,श्री.बाळासाहेब तांबोळी,ओबीसी मोर्चा सदस्य श्री.दिपक खोंड,ओबीसी मो.सचिव इशांत घाटकर,कामगार आघाडी सरचिटणीस श्री.आनंद पूर्णपात्रे,भाजयुमो सरचिटणीस श्री.अवधूत टोंगळे,श्री.संजीव वैद्य,श्री.विजय पंडीत,श्री.मकरंद मालकर,श्री.कैलास सांडभोर,श्री.आबा डंबे हे उपस्थित होते.
यावेळी वाढदिवसानिमित्त उपाध्यक्ष श्री.सुधीरदादा खांबेटे,भाजयुमो सचिव श्री.प्रसाद भेगडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन मन की बात संयोजक श्री.हिम्मतभाई पुरोहित,भाजयुमो अध्यक्ष श्री.अक्षय भेगडे,जि.सचिव श्री.संजय वाडेकर,सरचिटणीस श्री.प्रमोद देशक,श्री.विनायक भेगडे,सचिव श्री.सोमनाथ त्रिंबके,भाजयुमो सचिव श्री.प्रसाद भेगडे,का.आ.उपाध्यक्ष श्री.सतिष पारगे,का.आ.सदस्य श्री.आतिष रावळे,ओ.मो.प्रसिद्धीप्रमुख श्री.अमित भागीवंत यांनी केले.

error: Content is protected !!