पिंपरी:
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड मनपा आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मुख्य आरोग्य निरीक्षक एस. एस. गायकवाड,स.आ.नि.एम.एम.शिंदे,आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर,भुषण शिंदे,संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
चिंचवड भागातील जुना जकात नाका ते संत ,नामदेव चौक चिंचवडेनगर परिसरातुन प्लॕस्टीक प्लाॕगेथाॕन म्हणजेच फक्त प्लॕस्टीक कॕरीबॕग,गुटखा पौच,पाण्याच्या बाटल्या,दुध पिशव्या,पावाच्या बॕग,उदबत्ती बॕग,इंजेक्शनचे प्लॕस्टीक अशा विविध प्रकारचे प्लॕस्टीक जमा करण्यात आले.
या अभियानात पिंपरी चिंचवड आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी तसेच संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड अनुषा पै,दत्तात्रय देवकर सभागी झाले होते एकूण ८ पोती प्लॕस्टीक जमा झाले.

error: Content is protected !!