वडगाव नगरपंचायत वतीने शहरात पावसाळ्यापूर्वी ओढे – नाले साफसफाई करण्याच्या कामास सुरुवात
वडगाव मावळ:
येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असल्याने वडगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील ओढे-नाले साफसफाईच्या सर्व कामांना दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यापूर्वी सुरुवात करण्यात आली आहे.
शहरातील काही उघडी गटारे साफ करणे तसेच त्यातील गवत काढण्याबाबत नगरपंचायत मधील संबंधित अधिकारी यांना नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा पुनम जाधव यांनी सुचना दिल्या आहेत.
तसेच शहरातील बाजारपेठ व अन्य भागात विद्युत पुरवठा करणाऱ्या विजेच्या खांबाला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात येणार असून जेणेकरुन कोणताही अपघात किंवा समस्या उद्भभवणार नाहीत.
याव्यतिरिक्त नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी महावितरण कंपनीला पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त असलेल्या विद्युत वाहिन्या दुरुस्त करण्यासंदर्भात निवेदन दिले असता आज वीज वितरण कंपनीने संबंधित कामांना सुरुवातही केली आहे.

error: Content is protected !!