कचऱ्याची समस्या सोडविण्याची गरज
जागोजागी पडणारे कचऱ्याचे ढीग आरोग्यास घातक
टाकवे बुद्रुक:
मावळ तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्या मधील आंदर मावळ भागामधील 40 ते 45 गावचे प्रवेशद्वार, आंदर मावळची राजधानी, अशा विविध पदव्यांनी ओळखले जाणारे टाकवे बुद्रुक गाव , दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक पंधराव्या वित्त आयोगांतर्गत बेलज येथील गायरान जागेत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध होत असल्यामुळे कचरा व दुर्गंधी हि समस्या खूप मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. दरम्यान वाढत्या नागरीकरणामुळे व कॉंक्रिटच्या जंगलाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घाणीचे साम्राज्य वाढण्यास मुख्य कारण ठरत आहे. दरम्यान या कचर्‍याच्या ढिगार्‍यात मध्ये पाळीव जनावरे प्लास्टिक खात असल्यामुळे त्यां जनावरांना अनेक प्रकारचे आजार बळवण्याचा खूप मोठा धोका आहे.
दरम्यान टाकवे बुद्रुक या ठिकाणी उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत असल्यामुळे आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ तसेच शहरी भागातील अनेक नागरिक या ठिकाणी त्या निमित्ताने येत असतात. दरम्यान गावच्या भोवताली घाणीचे साम्राज्य असल्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सरपंच यांच्या निर्णयाखाली सुरू करण्याचे ठरले होते .
येथील स्थानिक नागरिकांकडून प्रकल्पाला विरोध दर्शविला गेला .परिणामी ग्रामपंचायत यामध्ये कशा प्रकारे पुढाकार घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा गंभीर प्रश्न कसा व कधी सोडवनार ? कि हा बेलज व ग्रामपंचायत मध्ये कळीचा मुध्दा ठरणार हे पाहावे लागणार आहे.
सरपंच भूषण असवले म्हणाले,”
बेलज या ठिकाणी गायरान उपलब्ध आहे. दरम्यान ग्रामपंचायत मधील पदाधिकाऱ्यांच्या ठरलेल्या निर्णयानुसार त्याठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करणार आहे. त्या जागेच्या गटाची ग्रामपंचायत कडून भुमी अभिलेख मार्फत मोजणी केली जाणार असून त्या गट नंबर मधील जागा संपादित करून काही भागात घनकचरा व्यवस्थापन केले जाणार आहे .
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी बेलज येथील जागेचा ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद याठिकाणी शासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे, काही त्रुटी असल्यामुळे ते पंचायत समिती वडगाव मावळ या ठिकाणी चौकशीसाठी आलेले आहेत, काही दिवसापूर्वी त्या गटाची मोजणी करण्यास गेलो असता तेथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे,त्यामुळे मोजणी होऊ शकली नाही. वरिष्ठ विभागाचा आदेश येईपर्यंत त्या ठिकाणीचा प्रकल्प थांबविण्यात आला आहे. सर्व शासकीय पेपर पूर्तता झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास अधिकारी सुभाष बांगर यांनी दिली.
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी ज्ञानेश्‍वर साबळे म्हणाले,”
गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायतीमार्फत ट्रॅक्टरमध्ये गावांतील कचरा गोळा करून दिवसाला दोन ते तीन कचऱ्याचे ट्रॅक्‍टर दलितवस्तीच्या बाजूला लोटले जात आहे.
दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांन मार्फत त्या कचर्‍याच्या ढिगार्‍याला नेहमी आग लावली जाते. प्रामुख्याने कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक, ओला कचरा टाकाऊ वस्तु असल्यामुळे धुराचे खूप मोठे लोळ तयार होत आहेत.
तसेच ज्याठिकाणी कचऱ्याचा ढीग टाकला जातो त्याच बाजूला काही अंतरावरती दलित वस्ती, माध्यमिक, प्राथमिक शाळा, कॉलेज, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय देखील आहे.तसेच या कचर्‍याच्या ढिगार्‍याच्या दुसऱ्या बाजूला वन विभागाचे क्षेत्र लागून आहे, त्या कचर्‍याच्या ढिगार्‍याला नेहमी आग लावली जात असल्यामुळे
,हवा अशुद्ध होऊन धूराच्या लोळामुळे ह्या भागातील लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांना श्वसनाचे त्रास होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या जंगलामध्ये वास्तव्यास असणार्‍या अनेक प्रकारचे पशु-पक्षी यांनासुद्धा त्रास होऊन मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात या संदर्भात अनेक वेळा निवेदन दिले आहे, ग्रामपंचायत मार्फत अद्याप पर्यंत कचरा व घाणीचे साम्राज्य हा गंभीर प्रश्न सोडवण्यात आलेला नाही.घनकचरा व्यवस्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी ग्रामपंचायत मधील शासकीय अधिकारी, सरपंच व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
बेलज येथील स्थानिक नागरिक उमाकांत मदगे म्हणाले,”
आम्ही नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी जिल्हा अधिकारी राजेश देशमुख, तहसीलदार वडगाव मावळ मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना निवेदन दिले आहे. यामध्ये जमीन गट नंबर २०६ या जमिनीवर जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाने सन 2019/20 मध्ये घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. या गटामध्येलोकवस्ती आहे. त्यामुळे या जागेवर घनकचरा व्यवस्थापन करू नये, या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे, तरी घनकचरा व्यवस्थापन साठी टाकवे ग्रामपंचायतीने पर्यायी जागा फळणे या ठिकाणी गायरान आहे व त्या ठिकाणी लोक वस्ती नाही त्यामुळे त्यांनी तो पर्याय निवडावा. आमचा विरोध कायम स्वरूपी असाच राहणार आहे.

error: Content is protected !!