
डबेवाल्याच्या अंगाची होते लाही लाही
मुंबई:
वैशाख वणवा चालू झाला आहे तापमान दिवसे दिवस वाढत आहे.महाराष्टात येत्या काही दिवसात उष्णतेची लाट आहे तापमान अंश अंशाने वाढत जात आहे. तेव्हा नागरीकांनी उन्हात फिरू नये असा वैधानिक इशारा दिला गेला आहे.
पण डबेवाले बांधवाला उन्हात काम केल्या शिवाय पर्याय नाही. मुंबईतील उन्हाळा आणी आद्रता या मुळे डबेवाला बांधव नखशिखांत घामाने न्हावुन निघतो आहे. डबे पोहचवणे हे काम प्रामुख्याने दुपारी असल्यामुळे तो भर दुपारी सायकल वरून कार्यालयात डबे पोहचवतो आहे.
उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता डबेवाला मुंबईत काम करत आला आहे. परंतु डबेवाला हा सुध्दा माणुस आहे भर दुपारी अंग मेहनतीचे तो काम करतो त्या मुळे त्याला ही उन्हाचा त्रास होतो. पण सांगणार कोणाला ?
उन्हा पासुन बचाव होण्यासठी तो कधी डोक्यावर पाण्याने भिजलेला रूमाल बांधतो. त्याने आपले डोके थंड ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर शरीर थंड ठेवण्यासाठी ज्या कार्यालयात डबे पोहचवले त्या कार्यालयातील कुलरचे थंड पाणी पितो.
पुढील काही दिवस कडक उन पडणार आहे अशा वेळी डबेवाल्यांनी आपली सर्वोतोपरी काळजी घेऊन काम करावे उन्हाच्या झळा अधिक लागणार नाही याची दक्षता घ्यावी
असे आवाहन “ मुंबई डबेवाला असोशिएशन”चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




