महाराष्ट्र शासनाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे येथे वडगांव नगरपंचायतीस स्चछतेसंबधित कामांबाबत लोकमान्य पुरस्कार प्रदान
वडगाव मावळ:
वडगाव नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियान कार्यकाळात पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वावर आधारित शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी याउद्देशाने विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याने शासनानाशी संलग्नित लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑफ. सोसायटी, पुणे व सकाळ समूह एनआयई यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव शहरात स्वच्छता संबंधित केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाचे वैद्यकीय सल्लागार श्री. रमणजी गंगाखेडकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व सकाळ समुहाचे संचालक यांच्या शुभहस्ते वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर, उपनगराध्यक्षा पुनम जाधव यांना लोकमान्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शासनाचे वैद्यकिय सल्लागार श्री. रमन गंगाखेडकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका सौ. मृणाल पवार, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑफ. सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर, उपनगराध्यक्षा पुनम जाधव, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे
संचालक श्री. पंढरी परब आणि सकाळ समूहाचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांनी सांगितले वडगांव शहरात करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांसोबतच स्वच्छतेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून हा सन्मान आमचा नसून नगरपंचायत मधील सर्व कर्मचारी बांधव, भगिनी व आम्हांला सहकार्य करणाऱ्या सर्व नगरसेवकांचा, शहरवासीयांचा तसेच प्रशासकीय अधिकारी यांचा हा सन्मान आहे.

error: Content is protected !!