मावळमित्र न्यूज विशेष:
राम कृष्ण हरी…वारकरी संप्रदायाचा पवित्र मंत्र.. संत ज्ञानेश्वर माऊली…अन् संत तुकोबाराय वारकरी बांधवांची श्रद्धास्थाने..पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती हेच जन्माचे सार्थक…मानणारे वैष्णव कायमच भक्तीच्या डोहात… डुंबत असलेल्याचा परिवार पवन मावळातील पाचाणे गावचा.
मावळ तालुक्यातील प्रसिद्ध किर्तनकार जयश्रीताई येवले यांचा. या परिवाराने संप्रदायाचे लेणं लावले आहे. संप्रदायाला सामाजिक कार्याची जोड देत हा परिवार सामाजिक बांधिलकी जपतोय. कर्तबगार पुरूषाच्या मागे स्त्री खंबीर पणे उभी राहिल्याचा इतिहास आपणाला सर्वश्रुत आहे. अगदी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्त्री पुरुष समानतेचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची नावे आदराने घेतली जात आहे.
फुले दांपत्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांना आदर्श मानून समाजात आज मोठ्या प्रमाणात स्त्रीशक्तीतीच्या मागे पुरूषांची ताकद असल्याचे दिसते. आजमितीला प्रत्येक क्षेत्रात यशाच्या शिखरावर मायमाऊल्या उभ्या आहे. राजकारण,समाजकारण,औद्योगिकीकरण, सेवा व्यवसाय,व्यापार,उद्योग,नोकरी,व्यवसाय,प्रसार माध्यमे, सिने नाट्य क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या कर्तृत्वाला आमच्या पुरुष बांधवानी आधार दिला, पाठबळ दिले,प्रसंगी तो मन मारून जगला पण अर्धांगिनीच्या पाठीशी उभा राहिला.


याच धर्तीवर जयश्री ताई अक्षय महाराज येवले,संत विचारांचा प्रचार आणि प्रसार करीत समाज प्रबोधन करीत आहे. त्यांची खंबीर पणे पाठराखण करीत त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे अक्षय महाराज येवले. काॅम्प्युटर इंजिनियर असलेल्या अक्षय महाराजांनी स्वतःला सिद्ध केले. आई वडीलांची मान उंचावले असे व्यक्तिमत्व केले. यासाठी त्यांनी सातत्याने नव्याचा ध्यास घेतला. सकारात्मक विचाराला आपलेसे केले.आणि स्वतःला संताचे पाईक समजले. संत विचारांची कास धरली.परिणामी जीवनात मांगल्याचा सुगंध दरवळू लागला.
आई वैजयंता ज्ञानेश्वर येवले आणि वडील ज्ञानेश्वर येवले यांनी कष्टातून लेकरांना शिकवले,घडवले. संस्कृत केले. संताच्या विचारांची सांगड घालत संगोपन केले परिणामी अक्षय महाराज इंजिनियर झाल्यावर त्यांनी संत विचाराला स्वीकारले आणि टिकवले. अक्षय महाराज यांची सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,सांप्रदायिक विचारांची पाऊलवाट दिवसागणिक वाढत चालली आहे.या वाटेवरून जाताना अनेक वळणावरून जातायेता भलेबुरे अनुभव येत आहे. या अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन येवले परिवार पुढे जात आहे.
स्वतःला सिद्ध करताना अनेक चांगले वाईट अनुभव आले. कधी विसावा घ्यावा असेही वाटले. कधी चालण्याचा वेग मंदावतो म्हणून भरभर चालावे असेही वाटले.पण त्यांनी संयम आणि धीर सोडला नाही. घेतलेला वसा सोडायचा नाही,हे संताचे व्रत आहे,ती ज्ञानोबा तुकोबाची पालखी घेऊन पुढे जायचे आहे. म्हणून हे दांपत्य निघाले आहे. वाटेतील अडथळे दूर करीत पुढे चाललेले आहे. त्यांच्या या चालण्याला पांडुरंग परमात्मा बळ देतोय. भगवंत त्यांच्या कडून सेवा करून घेतोय. किंबहुना सर्वाना सोबत घेऊन चला असा दृष्टांत देतोय.
ही भगवंताची सेवा गोड मानून जयश्री ताई यांच्या खांद्याला खांदा लावून अक्षय महाराज पुढे जात आहे.जयश्री ताईंची किर्तन आणि प्रवचनांची मंत्रमुग्ध अमृतवाणी आणि या वाणीला अक्षय महाराजांची साथ महाराष्ट्र पाहतोय. पत्नीचा गौरव होतो ना होतो तोच पतीही अनेक पुरस्काराचे मानकरी होत आहे,असा दुर्मीळ योगायोग महाराष्ट्राने पाहिला आहे. पाचाणे सारख्या खेड्यापाड्यातील येवले महाराज यांचे नाव सर्वदूर पसरले असून या नावात भक्तीचा सुगंध दरवळताना दिसतोय.
अखिल वारकरी संघाचे सदस्य,पुणे जिल्हा संघटक,महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष अशा पदावर काम करणारे अक्षय महाराज कुटूंबवत्सल आहे. नवयुग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या अक्षय महाराज यांचे सामाजिक कार्य वाखण्या सारखे आहे. नव्या पिढीला कायमच प्रेरणा,प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणारे अक्षय महाराज तरूण पिढीत लोकप्रिय आहे. नवयुग एन्टरप्रायझेस मल्टीनॅशनल सर्व्हिसेस मधून तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. क्षणभर विश्रांती नावाच्या हाॅटेल व्यवसायात त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे.
स्वतःचाच विचार करून काम करणारे पुष्कळसे आपल्याला पावलापावलावर भेटतील पण सामाजिक कार्यातही इतरांना मदत करणारे अक्षय महाराज यांच्या सारखे विरळच. वारकरी संप्रदायाचे लेणं घेऊन सामाजिक कार्याचा वसा जपणारे अक्षय महाराज येवले यांचा आज वाढदिवस आहे. दिवसभरात वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा स्वीकारून अधिक वेगाने समाजासाठी राबणा-या अक्षय महाराज यांना अधिक बळ मिळो ही सदिच्छा.लोकसेवे सोबत अध्यात्मिक विचारांच्या अधिष्ठानावर आरूढ असलेल्या अक्षय महाराज यांना वाढदिवसांच्या आभाळभर शुभेच्छा..

error: Content is protected !!