सांगिसे:
कै. उषाताई लोखंडे माध्यमिक विद्यालय,सांगिसे या विद्यालयात “महाराष्ट्र दिन व कामगार दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच वार्षिक निकाल वितरण झाले. सरपंच बबनराव टाकळकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील इ 8 वी व इ 9 वी च्या वर्गांतील विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल वर्गशिक्षक श्री.ज्ञानेश्वर अरनाळे व श्री.अनिल शिंदे यांनी घोषित करून वितरीत केला.
शाळेचा इ 8 वी व इ 9 वी चा निकाल 100% टक्के लागला आहे.तर इ 8 वीतील सर्व विद्यार्थी श्रेणीनुसार पुढील वर्गास पात्र झाले आहेत.तर इ 9 वी मध्ये खालीलप्रमाणे विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.
इयत्ता 9 वी गुणवंत विद्यार्थी,प्रथम क्रमांक
कु.रोशनी दत्तात्रय साबळे- 84.17%,द्वितीय क्रमांक
कु.पुर्वा अमित जाधव-83.50% तृतीय क्रमांक
कु.पायल पप्पू साबळे -83.33% हिने मिळवला.
सर्व उत्तीर्ण व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता वंजारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मनोगतही व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अंबादास गर्जे यांनी केले तर आभार श्रीमती सविता शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.दशरथ ढोरे,श्री.अमोल आल्हाट यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!