
नववीच्या मुलांवर अन्याय करू नका : विशाल वाळुंज
तळेगाव दाभाडे :
शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा म्हणून काही शाळांमधील इयत्ता ९ वी तील अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविले जात नाही. त्याच वर्गात ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. पर्याय म्हणून इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा फॉर्म नंबर १७ भरण्याचा पर्याय सुचविला जातो. ही बाब गंभीर असून संबंधित शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्हा काँग्रेस ग्रामीण सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष, शिक्षण ळाचे माजी सभापती विशाल वाळुंज यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विशाल वाळुंज, शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र दाभाडे, महेश फलके आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता नववीच्या वर्गात दोन वर्षे विद्यार्थ्यांना ठेवल्यामुळे मानसिक खच्चीकरण झालेले विद्यार्थी आत्महत्या करण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग खुला करणे आवश्यक आहे. गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे. मानसिक त्रास विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही होत आहे. शाळेविरुद्ध तक्रार करण्यास पालक घाबरतात.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




