
खडकाळे ग्रुप-ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली इंगवले यांची बिनविरोध निवड
कामशेत :
ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे (कामशेत) उपसरपंचपदी वैशाली सतीश इंगवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
खडकाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच शिल्पा दौंडे यांनी दीड महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवारी (दि.२९) कामशेत ग्रामपंचायतीत निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी वैशाली इंगवले यांचा एकमेव अर्ज आल्याने वैशाली इंगवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
या निवडणुकी दरम्यान ग्रामसेवक विलास काळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी सरपंच रुपेश गायकवाड, बापूसाहेब भेगडे, किशोर भेगडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, शरद हुलावळे, नारायण पाळेकर, कामशेत ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश दाभाडे, परेश बरदाडे, निलेश गायखे, दत्ता शिंदे, अभिजीत शिंगारे, दत्तात्रय रावते, अंजना मुथा, शिल्पा दौंडे, कविता काळे, विमल पडावकर, सुनीता गायखे, समीर जाधव, तानाजी पडवळ, गजानन शिंदे, तानाजी दाभाडे, विकेश मुथा,आनंद टाटीया, गणेश भोकरे, सुरेश लाड, अनिल इंगवले, श्रीपत शिंदे, रोहित यादव, सागर इंगवले, आनंद पडवळ आदी उपस्थित होते.
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर





