वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावभेट दौ-यास मोठा प्रतिसाद मिळत आहे हगावभेट दौऱ्याच्या तिस-या दिवशी सदापूर येथून सुरुवात झाली. कार्ला,वेहरगाव दहिवली, शिलाटणे,टाकवे खुर्द,फांगणे,मुंढावरे गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाम फलकाचे अनावरण करीत गावभेट दौरा सुरूआहे.नागरिकांचा भरभरुन पाठिबा मिळत आहे.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते या दौ-यात सहभागी झाले आहे.
गावातील जुन्या नव्या पिढीतील कार्यकर्त्याची भेट घेत सुरू असलेल्या दौ-यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराला नवी पिढी उत्साहाने साद घालत आहे .
आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीतील गावभेट दौ-यात गावपातळीवरील समस्या आणि त्यांचे निराकरण या अजेंड्याला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रीदवाक्य यशस्वी होत आहे.
गावभेट दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पाथरगाव, पिंपळोली, ताजे, बोरज, मळवली, पाटण, भाजे,देवले या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फलकांचे अनावरण करण्यात आले. तसेच या गावांमधील ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी, युवक यांच्या समस्या जाणून घेतल्या.
काही गावांमधील अंतर्गत रस्ते, पथदिवे, सांडपाणी व्यवस्थापन,कचरा, पिण्याचे शुद्ध पाणी अशा अनेक समस्या ग्रामस्थ मांडत आहेत.
या गावपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत गांभीर्याने लक्ष देत नाहीत,अशा ग्रामस्थांच्या तक्रारी येत आहेत. मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देऊन ती कामे मार्गी लावावीत.अशा सूचना आमदार शेळके यांनी ग्रामसेवक व स्थानिक प्रतिनिधींना दिल्या.मुख्य रस्ते, घंटागाडी, व्यायामशाळा, पाणी योजना यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आश्वासन त्यांनी दिले
रेशनिंगच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी एक दिवस प्रत्यक्ष गावात येऊन सर्व नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात,अशा सूचना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या थेट भेटीच्या दौऱ्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्नांची तात्काळ सोडवणूक होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
वाडिवळे येथील संगमेश्वराचे दर्शन घेऊन या संपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी वाडिवळे,वळक,सांगिसे,नेसावे,खांडशी,वेल्हवळी,उंबरवाडी या गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

error: Content is protected !!