

वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गाव भेट दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वाडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे,खांडशी,उंबरवाडी या गावांमध्ये पक्षाच्या फलकांचे अनावरण करण्यात आले. आणि ‘चला गावच्या समस्या जाणून घेऊया, आपल्या मावळला प्रगतीपथावर नेऊया’ या संकल्पनेनुसार प्रत्येक गावात जाऊन स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी संवाद साधला.या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक गावात जाऊन थेट ग्रामस्थांसोबत संवाद साधत असल्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणी व शंका समजून घेता आल्या.अनेकांनी लेखी स्वरूपात निवेदने दिल्याने समस्येचे निराकरण करण्यास मदत झाली.
काही गावांमध्ये विजेचे खांब, पानंद रस्ते, स्मशानभूमी, सभामंडप, अंतर्गत रस्ते यासाठी मागणीनुसार निधी उपलब्ध केला जाईल. आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आणि घरकुल संबंधित तक्रारींसाठी शिबीर आयोजित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष लक्ष देऊन दर्जेदार रस्ते करण्यावर भर आहे.पाणी योजनांची कामे देखील सुरु आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी गावस्तरावर अधिक प्रयत्न करण्यात येईल. नागरिकांनी सुचविलेल्या कामांची व समस्यांची दखल घेऊन ती नक्कीच पूर्ण केली जातील,असा विश्वास सर्वांना देतो.
यावेळी तहसीलदार श्री.मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी श्री.सुधीर भागवत, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष श्री.गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष श्री.साहेबराव कारके, नगरसेवक श्री.किशोर भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष श्री.संदीप आंद्रे, युवक अध्यक्ष श्री.किशोर सातकर, संघटनमंत्री श्री.नारायण ठाकर, श्री.दिपक हुलावळे, श्री.बाळासाहेब भानुसघरे,कार्याध्यक्ष श्री.सचिन मुऱ्हे, महिला अध्यक्षा सौ.दिपाली गराडे, युवती अध्यक्षा सौ.आरती घारे, ओबीसी सेल अध्यक्षा सौ.संध्या थोरात, कुलस्वामीनी महिला मंच अध्यक्षा सौ.सारिका शेळके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा सौ.पुष्पा घोजगे, कार्याध्यक्षा सौ.कल्याणी काजळे, देहु शहराध्यक्षा सौ.रेश्मा मोरे आदि.मान्यवर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी तसेच सरपंच, सदस्य, महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



