लोणावळा:
कोविड विरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावत असताना प्राण गमावलेले लोणावळा नगरपरिषदेचे कर्मचारी कै.बाबू दगडू घुले यांच्या वारसांना सानुग्रह सहाय्य अनुदान म्हणून ५० लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला.
कोरोना संकट काळात माणसापासून माणूस दूर जाताना आपण पाहिले. परंतु याच काळात स्वतःच्या जिवापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत अनेकांनी या लढ्यात मोलाची साथ दिली.परंतु स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना प्राण गमावलेल्या कोरोना योद्धांच्या योगदानाचा विसर आपल्याला पडता कामा नये.
ज्यांनी कुटुंबातील आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. त्यांचे दुःख आपल्याला कमी करता येणार नसले, तरी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.
‘समर्पित भावनेने कर्तव्य बजावलेल्या सर्वच कोविड योद्धांना माझा सलाम असल्याच्या भावना आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केल्या.
यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी अध्यक्ष गणेश ढोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंद, युवक अध्यक्ष किशोर सातकर उपस्थित होते.

error: Content is protected !!