वडगाव मावळ:
गेल्या काही महिन्यापासून एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी संप सुरू असल्याने त्याठिकाणांच्या एसटी प्रवाशी गाड्या बंद होत्या, परिणामी संप सुरू असल्यामुळे दळणवळणाची आर्थिक परस्थिती कोलमडली होती. एसटी बसने प्रवास करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना दुसरी कोणतीही प्रवासाची सोय नसल्यामुळे मेटाकुटीला आले होते.
दरम्यान मागील दोन दिवसापूर्वी ग्रामीण भागातील आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे साधन एसटी बस सुविधा सुरू झाल्यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये उस्तहाचे वातावरण आहे.
तळेगाव एसटी अंगारातून या मार्गी तळेगाव फळणे फाटा भोयरे सावळा तर दुसऱ्या मार्गी तळेगाव टाकवे बुद्रुक, वाहनगाव, खांडी असे एकूण 40 ते 45 गावातील वाड्या-वस्त्या वरील प्रवासी नागरिकांना एसटी बस सेवा पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे त्याचा लाभ होणार आहे.
आंदर मावळ मध्ये काही महिन्या नंतर प्रथमच लाल परीचे आगमन झाले त्यामुळे टाकवे बु., भोयरे, आंदर मावळ मधील ग्रामस्थांच्या वतीने एसटी बस वाहक व चालक यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी टाकवे बुद्रुक येथील माजी उपसरपंच रोहिदास असवले, सदस्य सोमनाथ असवले, काळुराम घोजगे, दत्तात्रय असवले, शालेय समिती अध्यक्ष अनिल असवले, माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, माजी चेअरमन विकास असवले, चेतन लोंढे, नवनाथ आंबेकर, व भोयरे येथील सरपंच बळीराम भोईरकर, सदस्य तानाजी खडके, ग्रामसेविका प्रमिला सुळके, तानाजी भोईरकर, दिंगबर आगिवले, मैफथ भोईरकर,तानाजी आडीवळे, नारायण आडीवळे, गोरख जांभूळकर, माजी सरपंच बाबुराव आडीवळे, विद्यार्थिनी गौरी करवंदे यांसह आदी नागरिक उपस्थित होते…
बळीराम भोईरकर म्हणाले,” एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहेत. तळेगाव दाभाडे एसटी आगारातील बस सेवा सुरू झाली आहे. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातही लाल परीची पुन्हा सेवा सुरू झाल्यामुळे तळेगाव दाभाडे परिसरातून राज्यातील विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांना तसेच मावळ तालुक्यात अंतर्गत प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गौरी करवंदे ( विद्यार्थ्यांनी)म्हणाली,”मागील काही महिन्यांपासून एसटी बस संप सुरू असल्यामुळे शहरी भागात शिक्षण घेण्यासाठी जाण्यास खूप अडचणी येत होत्या त्यामुळे शैक्षणिक अभ्यासावरती आर्थिक परिणाम झाला, तसेच प्रायव्हेट गाड्यांनी खर्च न परवडणारा त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती कोलमडली, दरम्यान ग्रामीण भागातून माझ्यासारखे महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी एसटीने प्रवास करणारे आहेत त्यामुळे पुन्हा एसटी बस कर्मचाऱ्यांवरती संपाची वेळ येऊ नये, व आमच्या प्रवासाच्या हाल होऊ नयेत.

error: Content is protected !!