तळेगाव दाभाडे एसटी आगार नियमितपणे सुरू कर्मचारीवर्गाने मानले किशोर आवारे यांचे आभार
तळेगाव दाभाडे:
एसटी कर्मचाऱ्यांचे पाच महिने काम बंद आंदोलन सुरू होते ,आता न्यायालयाच्या आदेशानुसार तळेगाव दाभाडे आगारातील सुमारे 85 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे . लालपरी धावल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे .
तळेगाव आगारात एकूण 35 बसगाड्या आहेत तर एकूण 190 कर्मचारी आहेत. त्यातील 160 एसटी कर्मचारी कामावर हजर राहिले आहेत, उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे .दरम्यान 20 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले असून त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेमार्फत कामावर रुजू करण्याचे प्रयत्न जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या माध्यमातून सुरू आहेत.
लवकरच बडतर्फ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेऊ असा विश्वास किशोर आवारे यांनी व्यक्त केला. एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परातल्याने आगारातील सोळा लांब पल्ल्याच्या बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये नाशिक, शिर्डी, अक्कलकोट ,पंढरपूर, तुळजापूर ,कोल्हापूर ,बीड, सोलापूर ,बार्शी ,पनवेल या गाड्यांचा समावेश आहे. स्थानिक प्रवाशांसाठी सात शेड्यूल्ड तातडीने सुरू केली आहे, त्यामध्ये लोणावळा निळशी ,खांडी ,सावळा आदींचा समावेश आहे .
आता दिवसाला 23 गाड्या वाहत आहेत. तळेगाव पंढरपूर एसटीला हिरवा कंदील दाखवत जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांनी एसटी आगार पुन्हा नेहमीप्रमाणे सुरू झाल्याचे जाहीर केले .याप्रसंगी एसटी कर्मचाऱ्यांनी किशोर आवारे यांचे आभार मानले एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी झालेल्या कामगारांना पगार मिळाला नाही परिणामी कर्मचारी कामगार आर्थिक अडचणीत सापडले होते त्यांना किशोर आवारे यांनी मदत केली, याबद्दल सर्वच कर्मचाऱ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.
करोना च्या पार्श्वभूमीवर तब्बल वर्षभर एसटी सेवा बंद राहिली. संपा पूर्वी दिवसाला पाच लाखांपर्यंत उत्पन्न होते एसटी कर्मचाऱ्यांचा संप व तळेगाव दाभाडे आगाराला सुमारे सात कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचे आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी सांगितले.
आगारातून पहिली बस
तळेगाव- पंढरपूर या मार्गावर सोडण्यात आली.
यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे ,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगरसेवक समीर खांडगे , जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत,
कामगार नेते विजय राऊत, प्रशांत शेवाळे,
पांडुरंग बांदल, चंद्रकांत भेगडे, मिलिंद परदेशी, अमोल रणदिवे, पुदिना खाते, प्रज्ञा पंदारे, सुलभा कोळी, सरिता कुळकर्णी, रोजतकर
उपस्थित होते.

error: Content is protected !!