

टाकवे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न
टाकवे बुद्रुक:
नवागत बालकांसाठी महत्त्वपूर्ण असणारा शाळा पूर्वतयारी मेळावा टाकवे येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सरपंच भूषण असवले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल असवले,ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा असवले,सुप्रिया शिंदे,उपाध्यक्ष विकास असवले,पोलीस पाटील अतुल असवले,ग्रामसेवक बांगर भाऊसाहेब,केंद्रप्रमुख सचिन अम्रुळे,मुख्याध्यापक,शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक दाखलपात्र विद्यार्थ्यांना विकासपत्राचे वाटप करण्यात आले.आनंददायी वातावरणात विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.तसेच शारीरिक,भावनिक,मानसिक,बौद्धिक विकासात्मक उपक्रम राबवण्यात आले.
पुढील शैक्षणिक वर्षात कोणताही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये व १००% पटनोंदणी व्हावी म्हणून हा मेळावा घेण्यात आला.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



