
वडगाव मावळ:
जैन धर्मातील २४वे तीर्थंकर श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक निमित्ते राष्ट्रीय महामार्ग वरील सोमाटणे फाटा टोल नाक्यावर सर्व वाहन चालकांना मिठाई वाटप करून श्री जैन विहार सेवा ग्रुप मावळ तालुका यांच्या वतीने एक विनंतीपूर्वक आव्हान करण्यात आले
की महामार्गावर १५००० च्या वर जैन साधु साध्वी आपल्या जीवनात सर्वोच्च त्याग करून आयुष्यभर कठीण तपस्या करत आपल्या आत्माच्या उद्गार बरोबर सत्य, अहिंसा, त्याग, तपस्या व सर्व प्राणीमात्रावर प्रेम करण्याचे संदेश देत अनवाणी पायी प्रवास करीत भारत भ्रमण करीत असतात.
त्याच बरोबर हजारो वारकरी संप्रदायामध्ये देहू. आळंदी. पंढरपूर या तीर्थक्षेत्र मध्ये पायी वारी करत असतात.
श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा. गगनगिरी महाराजांचे भक्तगण हेसुद्धा पायी चालतात
मागील वर्षी अशा एकाच वारी मध्ये एक अपघात होऊन चार ते पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्यासाठी सर्वधर्मीय साधुसंतांच्या व वारकऱ्यांच्या पायी यात्रा दरम्यान वाहनचालकाने थोडीशी काळजी घेऊन आपल्या वाहनांचा वेग कमी केला तर आपल्या या राष्ट्रीय साधुसंतांचा जीवनाचा संरक्षण होऊ शकते असे आव्हान करण्यात आले.
- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने
श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा - शिंदेघाटेवाडीत वृक्षारोपण तरूणांचा पुढाकार,ज्येष्ठांचे मार्गदर्शन
- टाकवे बुद्रुकला मोफत प्राणायाम शिबीर
- कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा
- मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध



