कुसूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हँडवॉश स्टेशन प्रोजेक्टचे उद्घाटन
टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील अतिदुर्गम असणाऱ्या कुसूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रोटरी क्लब अॉफ तळेगांव एम.आय.डी.सी या संस्थेच्या वतीने बांधलेल्या हँड वॉश प्रोजेक्टचे अध्यक्षा रो.सुमती निलवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब अॉफ तळेगांव एम.आय.डी.सी चे सचिव रो.प्रविण भोसले,उपाध्यक्ष रो.विल्सेन सालेर,कम्युनिकेशन डायरेक्टर रो.सचिन कोळवणकर,रो.योगेश शिंदे,युवा नेते अंकुश तुर्डे,शाळा व्यवस्थापन सदस्य रामदास तुर्डे,मा.ग्रामपंचायत सदस्या हौसाबाई मोरमारे,मुख्याध्यापिका सुजाता भोसले,अंगणवाडी सेविका नंदा मोरमारे इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्षा सुमती निलवे म्हणाल्या,”रोटरी क्लब अॉफ तळेगांव एम.आय.डी.सी चे संस्थापक अध्यक्ष रो.संतोषशेठ खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड्यातील विद्यार्थ्यांना हात धुण्याची सवय लागावी व त्यातून त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे या हेतूने हा प्रोजेक्ट कुसूर शाळेत बांधला आहे.विद्यार्थ्यांनी सतत हात धुण्याची सवय अंगिकारावी व स्वच्छतेचे महत्त्व आपल्या कुटुंबालाही समजावून सांगावे.”कुसूर शाळेत हा प्रकल्प राबवल्याबद्दल मुख्याध्यापिका सुजाता भोसले यांनी समाधान व्यक्त केले.रो.विल्सेन सालेर यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करुन दाखवले.कुसूर ही उपक्रमशील शाळा असून आम्हांला आमच्या शिक्षकांचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया युवा नेते अंकूश तुर्डे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास तुर्डे यांनी केले.सुत्रसंचालन उमेश माळी यांनी तर आभार राजू वाडेकर यांनी मानले.हँड वॉश प्रोजेक्ट उपलब्ध झाल्याबद्दल विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण होते.

error: Content is protected !!