
वडेश्वर :
वडेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. वडेश्वर संस्थेत १३ जागा असून १२ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. एक जागा रिक्त राहिली आहे
दिवंगत शिक्षिक नेते धों य .खांडभोर गुरुजी व जिल्हा दूध संघाचे माजी संचालक नथुराम लष्करी यांनी स्थापन केलेली सोसायटी वडेश्वर व नागाथली ग्रामस्थांच्या सहकार्याने बिंनविरोध होत आहे.
श्री बबन हेमाडे ,श्री नारायण ठाकर ,श्री शांताराम लष्करी ,श्री तानाजी शिंदे,श्री मारुती शिंदे, सौ आशाताई खांडभोर ,श्री महादू कशाळे .मधुकर तूपके .सौ कुसुमबाई लष्करी ,श्री राजू धों खांडभोर,श्री शंकर पांडे,श्री शैलाश हेमाडे बिनविरोध निवडून आले.
शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर , माजी चेअरमन छगन लष्करी , सदस्य माजी शंकर हेमाडे , माजी उपसरपंच तुकाराम लष्करी , कैलास खांडभोर,माजी चेअरमन मारुती खांडभोर यांनी विशेष प्रयत्न केले.
- पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज देणार :- माऊली दाभाडे
- महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
- गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
- बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर




