सोमाटणे:
गोडुंब्रे गावचे युवा उद्योजक पै. गौरव बाळासाहेब चोरघे यांची पवन मावळ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.
आमदार सुनिल शेळके, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले,नगराध्यक्ष मयूर ढोरे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे,देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे,माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले ,माजी संचालक अंकुश आंबेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!