वडगाव मावळ:
आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी रूपेश विठ्ठल घोजगे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी त्यांची निवड केली.
आमदार सुनिल शेळके, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले,नगराध्यक्ष मयूर ढोरे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे,देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे,माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,शरद पवार उपस्थित होते.
आंदर मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष रूपेश घोजगे म्हणाले,” आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह पक्ष नेतृत्वाने जो विश्वास टाकला,तो विश्वास नक्कीच सार्थ करीन. ग्रामीण भागात पक्ष संघटना वाढीसाठी पुढाकार घेईल.


,

error: Content is protected !!