
माहेरच्या सत्काराने देहूच्या उपनगराध्यक्ष भारावल्या
देहू:
देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी निवड झालेल्या सौ.रसिका स्वप्निल काळोखे यांचा त्यांच्या माहेरी शेलारवाडी ता.मावळ येथे ग्रामस्थांच्या वतीने शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रविंद्र शेलार,युवा नेते श्री.स्वप्निल काळोखे,देहूरोड शहर भाजप अध्यक्ष श्री.बाळासाहेब शेलार,अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे खजिनदार श्री.सुहास माळी,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री.सतिश भेगडे,उद्योजक अमित भेगडे,युवा नेते अतुल शेलार,अभिषेक शेलार,माऊली बालघरे इ.मान्यवर उपस्थित होते.शेलारवाडी गावच्या यात्रेनिमित्त लहूमामा शेलार युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे औचित्य साधून हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी भला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
शेलारवाडी येथील माहेरवाशीन मुलगी वरिष्ठ पदावर पोहोचल्याने खूप आनंद वाटला अशी प्रतिक्रिया श्री.रविंद्र शेलार यांनी व्यक्त केली.माहेरच्या माणसांनी केलेला सन्मान हा सामाजिक कार्य करण्यास प्रेरक ठरेल असे मत सौ.रसिका काळोखे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री.सतिश भेगडे यांनी तर आभार सुहास माळी यांनी मानले.शेलारवाडी गावातील मुलगी देहूच्या उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



