वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी मारूती तुकाराम असवले यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी त्यांची निवड केली.
आमदार सुनिल शेळके, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले,नगराध्यक्ष मयूर ढोरे,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे,देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे,माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,स्वामी जगताप,अनिल असवले, माजी चेअरमन रघूनाथ मालपोटे उपस्थित होते.
उपाध्यक्ष मारूती असवले म्हणाले,” राष्ट्रवादी पक्षाचे विचार पोहचवून पक्ष संघटना वाढीसाठी परिश्रम घेऊन घेतले जातील.

error: Content is protected !!