शेलारवाडी येथील श्री.अमरदेवी मातेचा चैत्र सप्तमीस उत्सव
शेलारवाडी:
मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील ‘श्री.अमरदेवी मातेचा’ चैत्र शु.सप्तमी उत्सव आज संपन्न होत आहे.जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत श्री.अमरदेवीचे मंदिर आहे.पिंपरी-चिंचवड,देहूरोड परिसर तसेच मावळ तालुक्यातून अनेक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात.पहाटे देवीचा अभिषेक,पुजा व आरती केली जाते.यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई केली जाते.देवी स्वयंभू असून येथे त्रिगुणात्मक महाकाली,महालक्ष्मी व महासरस्वती प्रत्यक्ष ब्रम्हरुपिणी ओंकारस्वरुपात अधिष्टित आहे.
सायंकाळी देवीची पालखी अमरदेवी पालखी मार्गाने शेलारवाडी गावात येते.बँड,ढोल लेझीमच्या निनादात पालखी ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करते.गावातील मारुती मंदिर,दत्त मंदिर,शितळादेवी मंदिर यांची आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेते.यात्रेनिमित्त पाहुण्यारावळ्यांची व मित्रपरिवाराची शेलारवाडी येथे वर्दळ असते.विविध खेळण्यांची दुकाने बालचमुंना आकर्षित करतात.सलग दोन दिवस असणाऱ्या या यात्रेत मनोरंजनात्मक कार्यक्रम गर्दी खेचतात.कोरोनामुळे सलग दोन वर्षे यात्रा रद्द झाली असल्याने व यावर्षी यात्रा मोठ्या स्वरुपात साजरी होत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!